संदेशखालीत जे काही घडले, ते पाहून कुणाचीही मान शरमेने खाली झुकेल. पण इथल्या सरकारला काहीही फरक पडत नाही. बंगाल सरकार आरोपींना वाचवण्यासाठी सर्वप्रकारच्या बळाचा वापर करताना दिसत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी जोरदार टीका केली. संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवार, ६ मार्च रोजी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला सुनावले.
टीएमसी सरकार कधीही महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही
बारासातच्या सभेत राज्यातील टीएमसी सरकारवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, ममता बॅनर्जींच्या राजवटीत घोर पाप झाले आहे. टीएमसीचे नेते ठिकठिकाणी महिलांवर आणि लहान मुलींवर अत्याचार करत आहेत. अशी प्रकरणे घडत असताना, तृणमूल काँग्रेसचा त्यांच्या नेत्यांवर विश्वास आहे, पण माता-भगिनींवर विश्वास नाही. त्यामुळेच येथील माता-भगिनींमध्ये प्रचंड रोष आहे. टीएमसीची माफिया राजवट उद्ध्वस्त करण्यासाठी राज्यातील माता-भगिनी आता पुढे सरसावल्या आहेत. टीएमसी सरकार कधीही महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, अशी भावना आता त्यांच्यातही जागृत झाली आहे. त्यामुळे त्यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी माता-भगिनीच त्यांना धडा शिकवतील, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी ममता सरकारला इशारा दिला.
TMC कडून अत्याचारी नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न
टीएमसी सरकार बंगालमधील महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना संरक्षण देत आहे. TMC आपल्या अत्याचारी नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाने बलात्काराच्या आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरतूदही केली आहे. भाजपा सरकारने महिला हेल्पलाइन तयार केली आहे. पण तृणमूल सरकार बंगालमध्ये त्याची अंमलबजावणी करू देत नाही. टीएमसी सरकार महिलांचे कधीही भले करू शकत नाही. पण आता टीएमसीची माफिया राजवट संपवण्यासाठी महिला शक्ती एकवटली आहे आणि ती नक्कीच यांचा सत्ता उलथवून टाकेल, असेही असेही मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
Join Our WhatsApp Community