Lok Sabha Election 2024 : फडणवीसांसह भाजपा नेते दिल्लीला रवाना

Lok Sabha Election 2024 : भाजपा महाराष्ट्रात ३२ जागा लढण्यावर ठाम आहे. शिवसेना शिंदे गटाला किमान १३ जागा हव्या आहेत. अमित शाह यांनी शिंदे गटाला ११ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. अजित पवार गटाला ५ जागा देण्यास अमित शाह तयार आहेत.

218
Lok Sabha Election 2024 : फडणवीसांसह भाजपा नेते दिल्लीला रवाना
Lok Sabha Election 2024 : फडणवीसांसह भाजपा नेते दिल्लीला रवाना

महायुतीमध्ये भाजपा (BJP), शिवसेना (Shivsena) शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) अजित पवार गट यांच्यात जागावाटपाबाबत संभ्रम आहे. केंद्रातील सत्ताधारी असलेला भाजपा अधिकाधिक जागांवर लढण्यास इच्छूक आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अपेक्षाही मोठ्या आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर हे भाजपाचे राज्यातील बडे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत.

(हेही वाचा – Connectivity : पंतप्रधानांच्या हस्ते कोलकाता येथे 15,400 कोटी रुपयांच्या ‘कनेक्टिव्हिटी’ प्रकल्पांचे लोकार्पण)

भाजपा महाराष्ट्रात ३२ जागा लढण्यावर ठाम

महायुतीमधील जागावाटपाबाबत तोडगा काढण्यासाठी अमित शाह यांच्या उपस्थितीत मागच्या २ दिवसांपासून चर्चा आणि मित्रपक्षांसोबत वाटाघाटी सुरू आहेत. भाजपा महाराष्ट्रात ३२ जागा लढण्यावर ठाम आहे. शिवसेना शिंदे गटाला किमान १३ जागा हव्या आहेत. अमित शाह यांनी शिंदे गटाला ११ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. अजित पवार गटाला ५ जागा देण्यास अमित शाह तयार आहेत. त्यामुळे आता आज भाजपाच्या प्रदेश कोअर कमिटीच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागलेले आहे.

महायुतीमध्ये जागावाटपाबाबत तिढा

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील घटक पक्ष म्हणजे भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. मात्र महायुतीमध्ये जागावाटपाबाबत एकमत नाही. प्रसारमाध्यमांमधून महायुतीमधील जागावाटपाबाबत वेगवेगळे फॉर्म्युले सांगितले जात आहेत. आपल्या विद्यमान खासदारांएवढ्या जागा तरी मिळाव्यात, यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. शिंदे गटाएवढ्याच जागा आपल्याला मिळाव्यात, अशी मागणी अजित पवार गटाकडून केली जात आहे. भाजपालाही लोकसभेच्या महाराष्ट्रातील ३० ते ३२ जागांवर लढायचे आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपाबाबत तिढा निर्माण झालेला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.