MahaShivaratri Wishes : महाशिवरात्रीच्या निमित्ताने आप्तस्वकियांना द्या ‘या’ शुभेच्छा… जाणून घ्या महाशिवरात्रीचे महत्त्व

MahaShivaratri Wishes : भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात. महाशिवरात्र हे व्रत 'माघ कृष्ण चतुर्दशी' या तिथीला करतात.

266
MahaShivaratri Wishes : महाशिवरात्रीच्या निमित्ताने आप्तस्वकियांना द्या 'या' शुभेच्छा... जाणून घ्या महाशिवरात्रीचे महत्त्व
MahaShivaratri Wishes : महाशिवरात्रीच्या निमित्ताने आप्तस्वकियांना द्या 'या' शुभेच्छा... जाणून घ्या महाशिवरात्रीचे महत्त्व

महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात. महाशिवरात्र हे व्रत ‘माघ कृष्ण चतुर्दशी’ या तिथीला करतात. या वर्षी महाशिवरात्र 8 मार्च या दिवशी आहे. देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. (MahaShivaratri Wishes)

महाशिवरात्री व्रताचे महत्त्व काय आहे ?

भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. तो काळ पृथ्वीवर वर्षातून एकदा महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो, कारण पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. पृथ्वी आणि उच्चलोकांतील कालमानात अंतर आहे. पृथ्वी जड (स्थूल) आहे. जडाची गती खूप कमी असते. म्हणजेच जडाला ब्रह्मांडात प्रवास करण्यास जास्त वेळ लागतो. देवता सूक्ष्म असल्याने त्यांची गती जास्त असते. त्यामुळे त्यांना ब्रह्मांडात प्रवास करण्यास कमी वेळ लागतो. यामुळेच पृथ्वी अन् देवता यांच्या कालमानात अंतर आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव सर्व जिवांना आवर्जून मार्गदर्शन करतात. त्यामुळे अनेक जीव शिवाकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्या दिवशी शिवलोकात उपस्थित असतात.

(हेही वाचा – Sandeshkhali : टीएमसीच्या राज्यात महिलांवर अत्याचार; मोदींनी घेतली संदेशखालीच्या पिडीत महिलांची भेट)

महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे ?

महाशिवरात्री व्रताचे दोन प्रकार आहेत – काम्य आणि नैमित्तिक. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचार पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी.

महाशिवरात्रीच्या रात्री करावयाची यामपूजा

शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, तसेच धोत्रा, आंबा आणि बेल यांची पत्री वाहावी. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. आशीर्वाद घेऊन व्रतसमाप्ती करावी. बारा, चौदा किंवा चोवीस वर्षे हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे.

शिवाने स्वत: भक्तांना आशीर्वचन दिले आहे, जे महाशिवरात्रीला माझे व्रत करतील, त्यांच्यावर माझी पुढीलप्रमाणे कृपादृष्टी होईल –

1. पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

2. कुमारिकांना मनासारखा वर मिळेल.

3. विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल.

(हेही वाचा – Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी विस्तारित मेट्रो मार्गाला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा)

महाशिवरात्रीच्या दिवशी हे अवश्य करा !

1. दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करा.

2. शिवपिंडीला अभिषेक करा.

3. पांढ-या अक्षता, पांढरी फुले, बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करा.

4. भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

महाशिवरात्रीला शिवाचा ‘ॐ नमः शिवाय ।’ (Om Namah Shivay) या षडक्षर मंत्राचा नामजप करा !

महाशिवरात्र या दिवशी शिव-तत्त्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह ‘ॐ नमः शिवाय ’ हा नामजप जास्तीतजास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते. आपल्याला शिव-तत्त्व अधिकाधिक ग्रहण करता येते.

(संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘शिव’)

महाशिवरात्रीच्या निमित्ताने आप्त स्वकियांना द्या शुभेच्छा !

१. भगवान शिवाच्या आशीर्वादाचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर वर्षाव होऊ दे. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

२. भगवान शिव तुम्हाला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देवो. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

३. महाशिवरात्रीच्या या शुभ प्रसंगी भगवान शिवाचे दिव्य आशीर्वाद तुमच्याबरोबर राहू दे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदी आणि समृद्ध उत्सवाच्या शुभेच्छा.

४. महाशिवरात्रीच्या दिव्य प्रकाशाने तुमचे जीवन आनंदाने भरून जावे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

५. भगवान शिव सर्वांना आशीर्वाद देवो आणि त्यांच्या जीवनात अडचणींचा सामना करणाऱ्या प्रत्येकाला शक्ती देवो ! (MahaShivaratri Wishes)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.