Underground Waste Bin : घाटकोपरमध्ये बसवल्या जाणार सहा भूमिगत कचरा पेट्या

Underground Waste Bin : घाटकोपरमधील अत्याधुनिक कचरा पेट्यांसाठी तीन जागा निश्चित

536
Underground Waste Bin : घाटकोपरमध्ये बसवल्या जाणार सहा भूमिगत कचरा पेट्या
Underground Waste Bin : घाटकोपरमध्ये बसवल्या जाणार सहा भूमिगत कचरा पेट्या

मुंबई महापालिकेच्यावतीने (Municipal Corporation) भूमिगत कचरा पेट्यांच्या उभारणीवर भर दिला जात असून मुंबईतील अनेक भागांमध्ये या भूमिगत कचरा पेट्या उभारल्या गेल्या आहेत.त्यानंतर रुग्णालय परिसरांमध्ये भूमिगत कचरा पेट्या बांधल्या जात असून आता घाटकोपरमधील ३ भागांमध्येही सहा कचरा पेट्या उभारल्या जाणार आहेत. यासाठी तब्बल ८८ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. (Underground Waste Bin)

(हेही वाचा- Chhatrapati Shivaji Maharaj : छ. संभाजी महाराज यांच्यावरील टपाल तिकीटाचे गुरुवारी होणार अनावरण)

भूमिगत  स्वरुपाचे २.२ घटमीटर क्षमतेचे कचऱ्याचे डबे 

मोकाट जनावरे आणि कचरा वेचकांकडून कचरा डब्यातील कचरा इतरत्र पसरवला जात असल्याने या कचऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक स्वरुपाच्या भूमिगत कचरा पेट्यांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. भूमिगत कचरा पेट्या बसवल्यास कचऱ्याची दुर्गंधी, अस्वच्छता तसेच नागरीकांना होणारा त्रास कमी होईल, या विचाराने महापालिकेने (Municipal Corporation) प्रायोगिक तत्वावर ए, डी, पी उत्तर आणि आर मध्य  या चार विभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे भूमिगत  स्वरुपाचे २.२ घटमीटर क्षमतेचे कचऱ्याचे डबे बसवण्यात आले. त्यानुसार मुंबईतील अनेक भागांमध्ये भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहर भागातील चार प्रमुख महापालिका रुग्णालयाच्या आवारात मिळून एकूण १५ भूमिगत कचरा पेट्या बसवण्याची प्रक्रिया सुर आहे. (Underground Waste Bin)

आमदारांची शिफारस

त्यातच आता  घाटकोपर येथील जगदुशानगर, सागर पार्क, बाणपाकोडे भटवाडी आदी तीन  ठिकाणी भूमिगत कचरा पेट्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून यासाठी विविध करांसह सुमारे ८८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी पल्स सोलार सिस्टीम या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Underground Waste Bin)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: वंचितच्या फॉर्मुल्याने मविआतील जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी वाढला, बैठकीत काय घडलं ? वाचा सविस्तर)

 महापालिकेच्या (Municipal Corporation) घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक आमदार राम कदम यांनी महापालिकेच्या एन विभागातील घाटकोपर पश्चिम मतदार संघाच्या परिसरात विविध ठिकाणी ९ भूमिगत कचरा पेट्या उभारण्याची मागणी केली होती. (Underground Waste Bin)

ही  तिन ठिकाणे झाली निश्चित

 परंतु या ठिकाणी जमिन भेदक रडार सर्वेक्षण करून भूमिगत कचरा पेट्या उभारण्याची व्यवहार्यता तपासण्यात आली. या सर्वच ९ ठिकाणी विविध भूमिगत सेवा असल्याने याठिकाणी कचरा पेट्या उभरणे शक्य नसल्याचे अहवालातून समोर आहे. पंरतु ०९ ठिकाणांपैंकी जगदुशानगर, सागर पार्क, बाणपाकोडे भटवाडी आदी ठिकाणी पुन्हा एकदा पाहणी केल्यानंतर येथील भूमिगत सेवा स्थलांतरीत करणे शक्य असल्याचे दिसून आले. त्यानुसार या जागा निश्चित करून भूमिगत सेवा योग्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. (Underground Waste Bin)

(हेही वाचा- Rameshwaram Cafe Bomb Blast : आरोपीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस; एनआयएने प्रसिद्ध केला फोटो)

कचरा पेट्यांचा खर्च दीड लाखांनी अधिक

त्यानुसार  एक वर्षांच्या हमी कालावधीनंतर २ वर्षांची देखभाल आदींसह या ०६ अत्याधुनिक कचरा पेट्यांची उभारणी करण्यासाठी निविदा मागवली आहे. या निविदेमध्ये एका कचरा पेटीसाठी सुमारे १४ लाखांचा खर्च केला जाणार असून काही दिवसांपूर्वी शहरांमधील चार प्रमुख रुग्णालयांच्या आवारात १५ कचरा पेट्या बसवण्यासाठी सुमारे  २ कोटींचा खर्च केला होता. यामध्ये एका कचरा पेटीसाठी सुमारे साडेबारा लाख रुपयांचा खर्च केला होता. त्यामुळे एका कचरा पेटींचा खर्च दीड लाखांनी वाढल्याचे दिसून येत आहे.(Underground Waste Bin)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.