Rahul Gandhi : राहुल गांधींना पनौती प्रकरण भोवले; निवडणूक आयोगाने म्हटले की…

Rahul Gandhi : निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राहुल गांधींना त्यांच्या पक्षाच्या सर्व स्टार प्रचारक आणि उमेदवारांना या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यास सांगितले आहे.

224
Rahul Gandhi : राहुल गांधींना पनौती प्रकरण भोवले; निवडणूक आयोगाने म्हटले की...
Rahul Gandhi : राहुल गांधींना पनौती प्रकरण भोवले; निवडणूक आयोगाने म्हटले की...

लोकसभा निवडणुकीच्या (loksabha election 2024) पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 2023 मध्ये नोव्हेंबरमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा नेत्यांच्या विरोधात भाषण करताना पाकीटमार आणि पनौती असे शब्द वापरले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भविष्यात होणाऱ्या जाहीर सभांदरम्यान आपल्या वक्तव्यांबाबत अधिक सतर्क आणि सावध राहण्यास सांगितले आहे.

(हेही वाचा – Underground Waste Bin : घाटकोपरमध्ये बसवल्या जाणार सहा भूमिगत कचरा पेट्या)

पनौती आणि पाकीटमार शब्द भोवले

पाकीटमार आणि पनौती या शब्दांच्या वापरल्याचे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) पोहोचल्यावर न्यायालयाने निवडणूक आयोगाला यावर कारवाई करण्यास सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी पनौती आणि पाकीटमार शब्द वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीसही पाठवली होती.

प्रचारादरम्यान विशेष काळजी घ्या

एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना १ मार्च रोजी नोटीस पाठवली असून प्रचारादरम्यान विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या २१ डिसेंबर २०२३ च्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर आणि यावरील राहुल गांधींचे उत्तर लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आणि भविष्यात संबोधित करताना सावध राहण्यास सांगितले आहे. तसेच निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राहुल गांधींना त्यांच्या पक्षाच्या सर्व स्टार प्रचारक आणि उमेदवारांना या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यास सांगितले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी 17 मार्च रोजी मुंबईत जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. राहुल गांधी 16 मार्च रोजी त्यांची भारत जोड़ो न्याय यात्रा घेऊन मुंबईत येत आहेत. राहुल गांधींचा हा दौरा मणिपूरपासून सुरू झालेला आहे. आता मुंबईत त्याची समाप्ती होणार आहे. राहुल गांधी 16 मार्च रोजी ठाण्यातील एलबीएस मार्गावरून मुंबईत दाखल होतील आणि त्यांच्या भारत जोड़ो न्याय यात्रेचा समारोप करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर पोहोचतील. (Rahul Gandhi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.