- ऋजुता लुकतुके
भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याने सलग दोन कसोटींत द्विशतकं ठोकली आहेत. आणि या फॉर्मवर आरूढ होत त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीतही दमदार आगेकूच केली आहे. कारकीर्दीत पहिल्यांदाच तो पहिल्या दहांत पोहोचला आहे. (ICC Test Ranking)
गेल्याचवर्षी त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आहे. आणि आधी वेस्ट इंडिज विरुद्धची, मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि आता इंग्लंड विरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी करत कमी वेळात तो दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. कसोटी फलंदाजाच्या क्रमवारीत त्याचे आता ७२७ रेटिंग गुण झाले आहेत. सलग दोन सामन्यांत द्विशतकं, तसंच एका मालिकेत ६०० च्या वर धावा असे विक्रम रचून विराट कोहली, सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर या दिग्गज भारतीयांच्या पंक्तीत तो आधीच जाऊन बसला आहे. (ICC Test Ranking)
एका मालिकेत ६०० च्या वर धावा करणारा तो फक्त पाचवा भारतीय फलंदाज आहे. त्याच्यापूर्वी सुनील गावसकर, दिलीप सरदेसाई, राहुल द्रविड आणि विराट कोहली या फलंदाजांनीच ही कामगिरी केली आहे. या मालिकेत २२ वर्षीय यशस्वीने (Yashasvi Jaiswal) ४ कसोटींत आतापर्यंत ९३.५७ धावांच्या सरासरीने ६५५ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकं आणि २ शतकांचा समावेश आहे. आता सुनील गावसकर यांचा एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यशस्वीला खुणावतो आहे. सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध एका मालिकेत ७७४ धावा केल्या होत्या. (ICC Test Ranking)
Yaahasvi Jaiswal breaks into the Top 10 ICC Test Ranking for Batters…. what a phenomenal rise!#jaiswal #icc #ranking #testranking #CricketTwitter pic.twitter.com/c6yQJoZhEz
— Shivani Kapur (@CricketMaiden88) March 6, 2024
(हेही वाचा – Award : अशोक सराफ, विजय चव्हाण, देवकी पंडित व कलपिनी कोमकली राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित)
न्यूझीलंडचा केन विल्यमसन पहिल्या स्थानावर कायम
कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत आता यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि विराट कोहली हे दोघे भारतीय फलंदाज पहिल्या दहांत आहेत. रोहित शर्माही राजकोट कसोटीतील १३१ धावांच्या खेळीच्या जोरावर दोन पावलं पुढे सरकून अकराव्या स्थानावर पोहोचला आहे. तर विराट कोहली ही अख्खी पाच कसोटींची मालिका न खेळूनही आठव्या स्थानावर आहे. (ICC Test Ranking)
न्यूझीलंडचा केन विल्यमसन पहिल्या स्थानावर कायम आहे. तर इंग्लिश फलंदाज जो रुट आता स्टिव्ह स्मिथला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमरा अजूनही अव्वल आहे. पण, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड आता बुमराच्या जवळ पोहोचले आहेत. बुमराच्या साथीने अश्विन आणि रवींद्र जडेजाही पहिल्या दहांतील स्थान टिकवून आहेत. (ICC Test Ranking)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community