- ऋजुता लुकतुके
पाहुण्या इंग्लिश संघातील काही खेळाडूंनी बुधवारी संध्याकाळी तिबेटचे बौद्ध अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांची सदिच्छा भेट घेतली. धरमशाला जवळ मॅकलॉईड गंज इथं दलाई लामा यांचं एक निवासस्थान आहे. कसोटीच्या एक दिवस आधी ही पूर्वनियोजित भेट पार पडली. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर या भेटीचा एक फोटोही पोस्ट केला आहे. (Ind vs Eng 5th Test)
‘क्रिकेटसाठीच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमुळे अशा वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांशी भेट घेण्याची संधी मिळते,’ असं ईसीबीने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. (Ind vs Eng 5th Test)
An incredible honour to meet his holiness, the @DalaiLama 🙏
England players and management attended his residence in McLeod Ganj, Dharamshala. pic.twitter.com/lW95xKbH7s
— England Cricket (@englandcricket) March 6, 2024
(हेही वाचा – वर्गात आली AI टीचर; केरळमध्ये झाला देशातील पहिला प्रयोग)
धरमशाला कसोटी गुरुवारपासून सुरू
‘दलाई लामांची भेट होणं हा खूप मोठा क्षण होता. इंग्लिश संघातील खेळाडू आणि व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांनी मॅकलॉईड गंज इथं दलाई लामांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली,’ असंही ईसीबीने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. झॅक क्रॉली, टॉम हार्टली, डॅन लॉरेन्स, ऑली पोप, गस ॲटकिनसन आणि सहाय्यक प्रशिक्षक मार्कस ट्रेस्कोथिक यांनी दलाई लामा यांची भेट घेतली. (Ind vs Eng 5th Test)
धरमशाला कसोटी गुरुवारपासून सुरू होत आहे. इंग्लिश संघ मालिकेत १-३ ने मागे आहे. धरमशाला कसोटीसाठी संघाने अंतिम अकरा खेळाडूंमध्ये एकच बदल केला आहे. रॉबिनसनच्या जागी पुन्हा एकदा मार्क वूडला पसंती देण्यात आली आहे. (Ind vs Eng 5th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community