Rohit Sharma on Domestic Cricket : ‘तंदुरुस्त आणि उपलब्ध असाल तर देशांतर्गत क्रिकेट खेळणं महत्त्वाचं’

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत नसाल तर देशांतर्गत क्रिकेटसाठी वेळ काढणं महत्त्वाचं असल्याचं मत रोहित शर्माने व्यक्त केलं आहे. 

160
Rohit Sharma : ‘मी खेळत राहणार जोपर्यंत….,’ रोहितने निवृत्तीची चर्चाच फेटाळली
  • ऋजुता लुकतुके

देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवून बीसीसीआयने (BCCI) अलीकडेच इशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांना मध्यवर्ती करार केलेल्या खेळाडूंमधून वगळलं. काही जणांना ही शिक्षा जाचक वाटली. तर काहींनी देशांतर्गत क्रिकेट खेळणं महत्त्वाचं असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली होती. या चर्चेत भारतीय कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त करताना, ‘बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त नसल्याचं प्रमाणपत्र दिलेलं नसेल, तर अशा खेळाडूने वेळ मिळेल तेव्हा देशांतर्गत क्रिकेट खेळलं पाहिजे,’ असं मत व्यक्त केलं आहे. (Rohit Sharma on Domestic Cricket)

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही सुरुवातीपासून हे मत व्यक्त केलं आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनाही द्रविड यांनीच सुरुवातीला रणजी सामने खेळण्याचा सल्ला दिला होता. बीसीसीआयने (BCCI) पुढे जाऊन अधिकृतपणे तसं सांगितल्या नंतरही इशान किशन झारखंड संघाकडून एकही रणजी सामना खेळला नाही. तर इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर श्रेयस अय्यरनेही मुंबई संघाच्या दोन सामन्यांना दांडी मारली. (Rohit Sharma on Domestic Cricket)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : शासकीय संकेतस्थळांवरून नेत्यांची छायाचित्रे हटवा; निवडणूक आयोगाच्या सूचना)

या खेळाडूने अजूनही खेळले नाही देशांतर्गत क्रिकेट

याचा फटका दोघांना बीसीसीआयच्या (BCCI) करारांत बसला. दोघांना कराराच्या यादीतून वगळण्यात आलं. ‘ही चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. जर खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त नसतील तर त्यांनी रणजी सामने खेळायला पाहिजेत. आणि हा नियम फक्त एक-दोघांसाठी नाही. तर सगळ्यांसाठी आहे. उपांत्य फेरीचे सामने ज्याप्रकारे खेळवले गेले, रणजी सामन्यांतही स्पर्धा आहे. तुमचा कस लागतो. आणि मोठ्या स्तरावर खेळण्यासाठी ही स्पर्धा तुम्हाला तयार करते,’ असं रोहितने बोलून दाखवलं. (Rohit Sharma on Domestic Cricket)

खेळाडू तंदुरुस्त नसेल आणि बीसीसीआयने (BCCI) तसं प्रमाणपत्र खेळाडूला दिलं, तर ठिक आहे. अन्यथा, खेळाडूने सगळ्या प्रकारचं देशांतर्गत क्रिकेट खेळलं पाहिजे, असं रोहितचं म्हणणं आहे. यात त्याचा इशारा मुंबई संघातील त्याचा सहकारी श्रेयस अय्यरवरही होता. श्रेयसने पाठदुखीची तक्रार केली होती. पण, क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय पथकाला तपासणीत तसं काही गंभीर आढळलं नाही. पण, श्रेयसने विश्रांती आणि संभाव्य पाठदुखीचं कारण देत आधी शेवटचा साखळी सामना आणि मग उपउपांत्य सामन्यातूनही माघार घेतील. त्यामुळे आयपीएलसाठी तंदुरुस्त राहण्याच्या इराद्याने श्रेयसने रणजी सामना टाळला, अशी टीका त्याच्यावर झाली. बीसीसीआयने करारातून वगळल्यानंतर श्रेयस मुंबईकडून रणजी स्पर्धेचा उपांत्य सामना खेळला. पण, इशान किशनने अजूनही देशांतर्गत क्रिकेट खेळलेलं नाही. (Rohit Sharma on Domestic Cricket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.