Amit Shah : पंतप्रधान मोदींवर कोणत्याही घोटाळ्याचा आरोप नाही

संदेशखाली येथील घटनांनी प. बंगालमधील सरकारला १०० टक्के उघडं पाडलं आहे, महिला मुख्यमंत्र्यांच्या राज्यात धर्माच्या आधारे महिलांचं शोषण होत आहे, ते सहन केलंच जाऊ शकत नाही. आम्ही जोर लावून इथे लढाई लढू आणि प. बंगालमध्ये परिवर्तन घडवू.

146
Amit Shah : पंतप्रधान मोदींवर कोणत्याही घोटाळ्याचा आरोप नाही

देशात सध्या सीबीआय आणि ईडीच्या कारवाईवरून राजकारण सुरु आहे. केवळ विरोधकांवर या कारवाया केल्या जात आल्याचा आरोप होत आहे. आतापर्यंत भाजपाच्या कोणत्याही बड्या नेत्यावर कारवाई का झाली नाही असा प्रश्न विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या याच प्रश्नावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : शासकीय संकेतस्थळांवरून नेत्यांची छायाचित्रे हटवा; निवडणूक आयोगाच्या सूचना)

या कारवाया देशातील भ्रष्टाचाराल उघडं पाडत आहेत :

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अद्यापही ईडीच्या चौकशीला न जाता विरोध केला. तर, ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील प. बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्लाबोल करण्यात आला. त्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी ठणकावून सांगितले. तसेच, या कारवाया देशातील भ्रष्टाचाराल उघडं पाडत असल्याचंही त्यांनी म्हटलं

अमित शाह (Amit Shah) यांनी देशातील केंद्रीय संस्थांकडून होत असलेल्या धाडीवरुन भाष्य करताना, विरोधकांना आणि प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारला लक्ष्य केलं.

(हेही वाचा – Rohit Sharma on Domestic Cricket : ‘तंदुरुस्त आणि उपलब्ध असाल तर देशांतर्गत क्रिकेट खेळणं महत्त्वाचं’)

काय म्हणाले अमित शाह ?

लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्टीला उत्तर जनता देत असते. पश्चिम बंगालमध्ये ५२ कोटी एकत्र सापडतात. झारखंडमध्ये ३५५ कोटी रुपये रोकड आढळून येते. पैसे मोजता, मोजता मशिन्स गरम होतात. तरीही हे सर्वजण म्हणतात, आमच्यावर कारवाई करू नका. युपीए सरकारविरुद्ध ४० केस फक्त युपीएला दाखल करावे लागले. आम्ही विरोधात होतो, संसदेत प्रश्न उपस्थित करत होतो, पीआयएल करत होतो, तेव्हा कोर्टाच्या आदेशानंतर तपास केला जात होता. त्यावेळी, तुम्हीच सत्तेत होतात, या देशात न्यायालये आहेत. जर, कोणावर अन्याय होत असेल तर न्यायालयात जा. मात्र, १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे करणारे लोक तपासाला घाबरतात. म्हणूनच, ते असं वातावरण तयार करतात. (Amit Shah)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाचा पहिला सामना न्यूझीलंडशी)

चाराण्याच्या घोटाळ्याचा देखील आरोप विरोधक नरेंद्र मोदींवर लावू शकले नाहीत :

पुढे बोलताना अमित शाह (Amit Shah) म्हणाले की; “१२ लाख कोटींच्या घोटाळ्यांचा तपास आज आपल्यासमोर होत आहे. दुसरीकडे २३ वर्षांपासून नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. ते मुख्यमंत्री राहिले आहेत, पंतप्रधान राहिले आहेत. गेल्या १० वर्षांपासून देशात आमचं सरकार आहे. पण, चाराण्याच्या घोटाळ्याचा देखील आरोप विरोधक नरेंद्र मोदींवर लावू शकले नाहीत, असे म्हणत अमित शाह यांनी ईडी आणि सीबीआयकडून होत असलेल्या कारवाईसंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिले.

(हेही वाचा – Farmer Protest : हातात तलवार घेऊन कोणी आंदोलन करत का? ही अत्यंत लाजिरवाणी बाब…उच्च न्यायालय शेतकऱ्यांवर संतापले)

महिला मुख्यमंत्र्यांच्या राज्यात धर्माच्या आधारे महिलांचं शोषण :

तसेच, आम्ही पारदर्शकपणे सरकार चालवलं, सध्याच्या कारवाईतून हे सगळे उघड पडत आहेत. संदेशखाली येथील घटनांनी प. बंगालमधील सरकारला १०० टक्के उघडं पाडलं आहे, महिला मुख्यमंत्र्यांच्या राज्यात धर्माच्या आधारे महिलांचं शोषण होत आहे, ते सहन केलंच जाऊ शकत नाही. आम्ही जोर लावून इथे लढाई लढू आणि प. बंगालमध्ये परिवर्तन घडवू, असेही शाह यांनी कडक शब्दात सांगितले. (Amit Shah)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.