PM Narendra Modi : या नवीन जम्मू – काश्मीरची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती

आज समर्पित करण्यात येत असलेल्या विकास प्रकल्पांमुळे जम्मू-काश्मीरच्या विकासाला चालना मिळेल, असे पंतप्रधानांनी श्रीनगरमध्ये सांगितले. आज जम्मू आणि काश्मीर विकासाच्या नव्या उंची गाठत आहे, कारण जम्मू आणि काश्मीर आज मुक्तपणे श्वास घेत आहे.

174
PM Narendra Modi : या नवीन जम्मू - काश्मीरची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज म्हणजेच गुरुवार ७ मार्च रोजी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रशासित प्रदेशातील कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुमारे ५००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांनी आज उद्घाटन केले. पंतप्रधानांनी श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर ‘विकसित भारत, जम्मू आणि काश्मीरचा विकास’ या कार्यक्रमात जाहीर सभेलाही संबोधित केले.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : शासकीय संकेतस्थळांवरून नेत्यांची छायाचित्रे हटवा; निवडणूक आयोगाच्या सूचना)

पंतप्रधान मोदी म्हणाले,

“पृथ्वीवरील स्वर्गात येण्याची भावना शब्दांच्या पलीकडे आहे. श्रीनगरच्या अद्भुत लोकांमध्ये सहभागी होण्यासाठी मी खूप उत्साही आहे, हे नवीन जम्मू आणि काश्मीर आहे, ज्याची बऱ्याच काळापासून सर्वांना प्रतीक्षा होती. (PM Narendra Modi)

जम्मू आणि काश्मीर हे भारताचे हृदय आहे :

आज समर्पित करण्यात येत असलेल्या विकास प्रकल्पांमुळे जम्मू-काश्मीरच्या विकासाला चालना मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले. जम्मू आणि काश्मीर हे भारताचे हृदय आहे. जम्मू आणि काश्मीर हा स्वतःच एक मोठा ब्रँड आहे.(PM Narendra Modi)

(हेही वाचा – Farmer Protest : हातात तलवार घेऊन कोणी आंदोलन करत का? ही अत्यंत लाजिरवाणी बाब…उच्च न्यायालय शेतकऱ्यांवर संतापले)

श्रीनगर हे आता भारताच्या पर्यटन उद्योगाचे केंद्र आहे :

“श्रीनगर हे आता भारताच्या पर्यटन उद्योगाचे केंद्र बनले आहे”, असे सांगून मोदी म्हणाले की, विकसित भारतासाठी विकसित जम्मू आणि काश्मीरला प्राधान्य आहे. विकासाची ताकद, पर्यटनाच्या शक्यता, शेतकऱ्यांची क्षमता आणि जम्मू-काश्मीरच्या तरुणांचे नेतृत्व. येथूनच विकसित जम्मू-काश्मीर निर्माण करण्याचा मार्ग तयार होईल. श्रीनगर हे आता भारताच्या पर्यटन उद्योगाचे केंद्र आहे. (PM Narendra Modi)

जम्मू आणि काश्मीर आज मुक्तपणे श्वास घेत आहे :

जम्मू आणि काश्मीर आज विकासाच्या नव्या उंची गाठत आहे, कारण जम्मू आणि काश्मीर आज मुक्तपणे श्वास घेत आहे, असे पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले.

(हेही वाचा – Amit Shah : पंतप्रधान मोदींवर कोणत्याही घोटाळ्याचा आरोप नाही)

पंतप्रधानांचा कारागिरांशी संवाद : 

गुरुवारी श्रीनगर दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रदर्शनात स्थानिक उद्योजक आणि कारागिरांची भेट घेतली. स्थानिकांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान ‘विकसित भारत, जम्मू आणि काश्मीरचा विकास’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बक्षी स्टेडियमवर पोहोचले. राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांचा सत्कार केला. (PM Narendra Modi)

कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.