मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (hinduhridaysamrat balasaheb thackeray) आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधला. (Apala Davakhana)
(हेही वाचा- Saur Kushi Vahini Scheme 2.0 : शेतकऱ्यांना आता दिवसाही विजेचा लाभ घेता येणार; ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक)
मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिल पासून झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी देखील सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (Apala Davakhana)
वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यात मुख्यमंत्र्यांचे अचानक आगमन झाले. त्यांनी दवाखान्यातील, स्टोर रूम, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छ्ता गृह यांची पाहणी केली. यावेळी तेथे तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत आपल्या दवाखान्याविषयी अनुभव विचारला. (Apala Davakhana)
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत २२६ ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४२ लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. (Apala Davakhana)
मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. झीरो प्रिस्किपशन पॉलिसी एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Apala Davakhana)
(हेही वाचा- Saur Kushi Vahini Scheme 2.0 : शेतकऱ्यांना आता दिवसाही विजेचा लाभ घेता येणार; ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक)
यावेळी मुंबई शहर पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त वेलारासू, डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते. (Apala Davakhana)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community