Coastal Road : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या एका  मार्गिकेचे लोकार्पण येत्या शनिवारी

Coastal Road : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण 

479
Coastal Road : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या एका  मार्गिकेचे लोकार्पण येत्या शनिवारी
Coastal Road : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या एका  मार्गिकेचे लोकार्पण येत्या शनिवारी
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या परिसरात ३२० एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचे पार्क साकारले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  गुरुवारी या प्रकल्पाच्या पाहणीप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. दरम्यान, या कोस्टल रोड प्रकल्पाच्या एका मा उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.  या एका मार्गिकेच्या उद्घाटनाची तारीख दोन वेळा जाहीर झाली होती,आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या एका मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठी  महापालिका प्रशासन प्रयत्नशीर होते. परंतु त्यांची तारीख न मिळाल्याने या एका मार्गिकेचे लोकार्पण येत्या शनिवारी करण्यात येणार आहे. (Coastal Road)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाची पाहणी केली.  मरीन ड्राईव्ह ते वरळी असा  प्रवास करतांना त्यांनी प्रगतिपथावर असलेल्या कामांची पाहणी केली. तसेच प्रशासनाला योग्य त्या सूचनाही केल्या. (Coastal Road)
New Project 2024 03 07T183034.685
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री  दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा,  मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त  आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त  आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) (अतिरिक्त कार्यभार)  संजय कौंडण्यपुरे, उपायुक्त (परिमंडळ २)  प्रशांत सपकाळे आणि इतर संबंधित अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. (Coastal Road)
पार्क जागतिक दर्जाला साजेसे
मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वतीने बांधण्यात येत असलेल्या मुंबई किनारी रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या रस्त्यालगत ३२० एकर जागेत भव्य सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. २०० एकर जागेत वेगवेगळी झाडे लावण्यात येणार आहेत. हे पार्क जागतिक दर्जाला साजेसे असेल, असे नमूद करून मुंबई किनारी रस्ता देखील लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, असे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. (Coastal Road)
Coastal Road : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या एका  मार्गिकेचे लोकार्पण येत्या शनिवारी
रस्ते काँक्रिटीकरण कामांची पाहणी
त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वरळी मधील गणपतराव कदम मार्ग, सेठ मोतीलाल सांघी मार्ग आणि त्यानंतर दादर येथील दादासाहेब रेगे मार्ग या तीन ठिकाणी रस्ते काँक्रिटीकरण कामांची पाहणी केली. रस्ते काँक्रिटीकरणामुळे मुंबई महानगरात रस्ते खड्डे मुक्त होतील, याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. (Coastal Road)
रस्त्यांचे आयुर्मान व गुणवत्ता वाढेल
पावसाळ्यातील पाणी शोष खड्ड्यांद्वारे जमिनीत मुरवण्यासाठी या काँक्रिटीकरण कामांमध्ये ठराविक अंतरावर रस्त्यांच्या कडेला शोष खड्ड्यांचा देखील समावेश केला असल्याने ही कामे पर्यावरणपूरक आहे. तसेच उपयोगिता वाहिन्यांचा (डक्ट) देखील समावेश करण्यात आल्याने वेगवेगळ्या सेवा वाहिन्या त्यातून अंथरण्यात येतील. परिणामी रस्ते वारंवार खोदले जाणार नाहीत. त्यातून रस्त्यांचे आयुर्मान व गुणवत्ता वाढेल, असे मुख्यमंत्री महोदयांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नमूद केले. (Coastal Road)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.