सवलतीच्या दरात फॉरेन टूर पॅकेज देण्याच्या नावाखाली नागरिकांना क्लब मेंबर बनवून लाखो रुपयांची फसवणूक (Yatri club Of Holiday’s Pvt.Ltd, Cheating) करणाऱ्या एका कथित कंपनीच्या दोन संचालकाना गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने उत्तर प्रदेश आणि मुंबई येथून अटक केली आहे. या दोघांनी मागील वर्षभरात वेगवेगळ्या राज्यातील अनेकांना गंडा घातला आहे. (Mumbai Crime)
(हेही वाचा- Savarkar Taekwondo Academy : सावरकर तायक्वांदो अकॅडमीत संपन्न झाली कोरियन भाषा प्रशिक्षण कार्यशाळा)
हिमांशू तिवारी (२७) आणि नोमान जुबेर अहमद कैसर (२८) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही संचालकांची नावे आहेत. दोघे उत्तर प्रदेश राज्यात राहणारे आहेत. दोन वर्षांपूर्वी दोघांनी ‘यात्री क्लब ऑफ हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड’ ही (Yatri club Of Holiday’s Pvt.Ltd, Cheating) कंपनी सुरू केली होती. मुंबईत त्यांनी आपले कार्यालय उघडले होते. कार्यालयात जवळपास ३० जणांना नोकरीला ठेवले होते. या दोघांनी प्रथम टूर पॅकेज सुरू केले, काही महिने प्रामाणिकपणे हे टूर पॅकेज सुरू होते. (Mumbai Crime)
या दोघांनी कंपनीच्या नावाने बड्या हॉटेलात सेमिनार आयोजित करून सेमिनारसाठी येणाऱ्या लोकांना सवलतीच्या दरात फॉरेन ट्रिपचे आमिष दाखवून यात्री क्लब ऑफ हॉलिडेज क्लबची मेंबर शिप घेण्यासाठी तयार करून प्रत्येकी मेंबर शिप मागे ३ ते ६ लाख रुपये घेऊन लोकांची फसवणूक करीत होते. (Yatri club Of Holiday’s Pvt.Ltd, Cheating) मुंबईत अनेकांची फसवणूक केल्यानंतर या दोघांनी मुंबईतील कार्यालय बंद करून दुसऱ्या शहरात लोकांची फसवणूक सुरू केली होती. या दोघांविरुद्ध साकिनाका, घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून या दोघांचा शोध सुरू होता. (Mumbai Crime)
(हेही वाचा- CM Eknath Shinde : मुंबईकरांना आता आरोग्य उपचारावर खर्च करावा लागणार नाही)
गुन्हे शाखा कक्ष ३कडून या गुन्ह्याचा परस्पर तपास सुरू असताना या गुन्ह्यातील एक जण गोरखपूर येथे असल्याची माहिती कक्ष ३चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या पथकाला मिळाली. कक्ष ३ चे पथकाने उत्तर प्रदेश येथून हिमांशू याला अटक केली, तर नोमान जुबेर अहमद कैसर हा पेइंग गेस्ट म्हणून अंधेरी येथे राहत असल्याची माहिती मिळाली असता नोमान जुबेर याला अंधेरी येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या पथकाने केली. पोलीस उपायुक्त (गुन्हे) दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे, सपोनि. समीर मुजावर, पो.उपनिरीक्षक इंद्रजित सिरसाठ,अंमलदार.आकाश मांगले, राहुल अनभुले, सुहास कांबळे, भास्कर गायकवाड आणि शिवाजी जाधव , गणेश गोरेगावकर, विनोद परब, रवींद्र देवार्डे, युवराज देशमुख, वैभव गिरकर, विकास चव्हाण, आणि राहुल पाटील या पथकाने ही कारवाई केली. (Mumbai Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community