येत्या एक-दोन दिवसात तीनही पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीत बसून जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने आणि सामोपचाराने घेतील असे सांगतानाच तीनही पक्षांनी महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार केलेला असून चर्चा कोणताही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेऊन होणार नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. (Sunil Tatkare)
(हेही वाचा- BMC : महापालिका आयुक्त कोण? चहल की शिंदे?)
बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर गुरूवारी त्यांनी रायगड येथे पत्रकार परिषद घेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्याचवेळी अमित शहा यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा केली असून जागावाटप योग्य पद्धतीने व सन्मानपूर्वक केले जाईल असेही तटकरे यांनी यावेळी नमूद केले. (Sunil Tatkare)
मतदारसंघनिहाय जागा वाटपासंदर्भात पक्षनिहाय काहीच चर्चा झालेली नाही. या निव्वळ वावड्या आणि केवळ अफवा आहेत. मात्र पुढील दोन दिवसात मतदारसंघनिहाय एकंदरीत राजकीय चित्र नजरेसमोर ठेवून चर्चा होईल असेही तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. (Sunil Tatkare)
(हेही वाचा- Savarkar Taekwondo Academy : सावरकर तायक्वांदो अकॅडमीत संपन्न झाली कोरियन भाषा प्रशिक्षण कार्यशाळा)
अजून मागणी करण्याचा प्रश्नच आलेला नाही. बुधवारी प्राथमिक स्वरुपात चर्चा झाली. आम्हाला एनडीएमध्ये सहभागी होण्यामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य भूमिका बजावली होती. त्यामुळेच येत्या दोन दिवसात नक्की होईल आणि अत्यंत समन्वयाने, सामंजस्याने जागा वाटप होईल व लगेचच दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल असेही तटकरे यांनी यावेळी जाहीर केले. (Sunil Tatkare)
जागावाटप दोन दिवसात पूर्ण झाल्यावर बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आला तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार याच महायुतीच्या उमेदवार असणार आहेत असेही तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले. (Sunil Tatkare)
अनंत गीते यांनी २०१४ साली सुनील तटकरे (Sunil Tatkare) नावाचे अनेक उमेदवार उभे केले नसते तर त्यांना मी त्याचवेळी पराभूत केले असते. २०१९ मध्ये देशात आणि महाराष्ट्रात जबरदस्त लाट असतानाही फक्त पाच जागा त्यापैकी चार राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिसरी जागा कॉंग्रेसला मिळाली होती. त्यावेळी अनंत गीते यांचा ३३ हजाराने पराभव केला होता. त्यावेळेचे मित्रपक्ष आज नसतील, आता वेगळे मित्रपक्ष सोबत आहेत. त्यामुळे विनाकारण पोकळ दावा करत स्वतःच्या मनाची समजूत काढण्याचा प्रयत्न अनंत गीते करत आहेत. जनतेला मी गेल्या ४० वर्षांत केलेल्या कामाची पूर्ण माहिती आहे. हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला तर माझ्या नेतृत्वाने मी उभा रहावे असे ठरवले आहे. त्यामुळे निकाल लागेल त्यावेळी किती मोठ्या फरकाने एकतर्फी विजय होतो ते समजेल असा गर्भित इशाराही तटकरे यांनी गिते यांना दिला. (Sunil Tatkare)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community