अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड महंमद कासिम गुज्जर उर्फ सलमान उर्फ सुलेमान याला सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. (Mohammad Qasim Gujjar) लष्कर-ए तैयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेचा सक्रीय सदस्य असलेला महंमद कासिम गुज्जर अनेक दहशतवादी हल्ल्यांमधील असंख्य मृत्यू आणि अनेक जण जखमी होण्यास जबाबदार आहे. भारताविरुद्ध युद्धाच्या नियोजनात देखील त्याचा सहभाग आहे. देशाची एकता आणि अखंडता भंग करणारे कृत्य करताना कुणीही आढळल्यास त्याच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
(हेही वाचा – Chitra Wagh : शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं ते सर्वच कुचकामी; चित्रा वाघ यांची खोचक टीका)
युएपीए अंतर्गत कारवाई
गृहमंत्रालयाने जारी केलेल्या रिपोर्टनुसार महंमद कासिम गुज्जर दीर्घकाळापासून दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. ड्रोनद्वारे शस्त्रास्त्र, दारूगोळा, आयईडीसह अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे. लष्कर-ए-तैयबाचा सदस्य महंमद कासिम गुजर याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967 (Unlawful Activities (Prevention) Act) अंतर्गत ‘दहशतवादी’ (terrorist) म्हणून घोषित करण्यात आले आहे, असे गृह मंत्रालयाने प्रसारित केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
The Modi government has declared the dreaded mastermind of several terror attacks Mohammad Qasim Gujjar alias Salman alias Suleman as a designated terrorist.
An operative of the Lashkar-e Taiba (LeT) Mohammad Qasim Gujjar has caused numerous deaths and injuries with terror…
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) March 7, 2024
लष्कर-ए-तैयबाचा सक्रीय दहशतवादी
महंमद कासिम गुज्जर हा जम्मूच्या रियासी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचा संबंध लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी आहे. महंमद कासिम गुज्जर हा ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि सुधारित स्फोटक उपकरणे (आयईडी) पुरवतो. याने अनेक दहशतवादी हल्लेही केले आहेत. तसेच, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करत असतो. (Mohammad Qasim Gujjar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community