शहरातील विविध वाहतूक बेटे आणि क्षेपणभूमी / भरावभूमीच्या ठिकाणी वायू गुणवत्ता सर्वेक्षण करण्यासाठी तसेच नागरिकांच्या वायू प्रदूषण तक्रारींच्या अनुषंगाने वायू गुणवत्ता सर्वेक्षण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका स्वयंचलित वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण फिरत्या वाहनांचा (मोबाईल व्हॅन) वापर करणार आहे. मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांकाची वास्तव स्थितीदर्शक नोंद या फिरत्या वाहनांच्या मदतीने करण्यात येणार आहे. या वाहनांमार्फत उपलब्ध होणारी माहिती ही प्रयोगशाळेच्या माध्यमातून संनियंत्रित करण्यात येईल. नव्याने वापरात येणारी फिरती वाहने (मोबाईल व्हॅन) नागरिकांच्या प्रदूषण विषयक तक्रारीच्या अनुषंगाने वायू गुणवत्ता सर्वेक्षण करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. (BMC)
मुंबईतील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वंकष, दीर्घकालीन व तात्काळ उपाययोजना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. मुंबईतील विविध ठिकाणी वायू प्रदूषणाच्या नोंदी घेण्यासाठी फिरते सर्वेक्षण वाहन वापरण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी दिल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींचे जलदगतीने निवारण करण्यासाठी फिरत्या वाहनांमार्फत उपलब्ध होणारी माहिती उपयुक्त ठरणार आहे. तसेच यंत्रणेलाही या वाहनांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा उपयोग होईल. परिणामी प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस पावले उचलण्यासाठी ही उपलब्ध आकडेवारी अतिशय उपयुक्त ठरेल, अशी माहिती उपायुक्त (पर्यावरण) मिनेश पिंपळे यांनी दिली. (BMC)
मुंबई महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) पर्यावरण विभाग अंतर्गत वायू वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळा कार्यरत आहे. या प्रयोगशाळेमार्फत वातावरणीय वायू प्रदूषण मापन करण्यात येते. (BMC)
(हेही वाचा- Mohammad Qasim Gujjar : दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड महंमद कासिम गुज्जर दहशतवादी म्हणून घोषित)
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिनांक १८ नोव्हेंबर २००९ च्या सूचनापत्रात एकूण १२ प्रदूषकांची हवेच्या दर्जाची राष्ट्रीय मानके निर्धारीत करण्यात आली आहेत. त्यामध्ये So2, NO2, PM10, PM2.5, O3, Pb, CO, NH3, C6H6, BaP, As, Ni यांचा समावेश आहे. तसेच केंद्र सरकारच्या राजपत्रात वायू मापन शास्त्रीय पद्धती देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वातावरणातील घटकांचे मापन होणे आवश्यक आहे. (BMC))
“मुंबई वायू प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा – २०१९ हा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ०९ ऑक्टोबर २०१९ रोजी स्वीकारला आहे. या कृती आराखड्यातील “स्त्रोत गट : इतर शहर विशिष्ट ९ (i) नुसार विविध प्रदूषकांचे नमुने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची माहिती अभ्यासण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी नियमितपणे वायू सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. (BMC))
चार फिरत्या वायू गुणवत्ता सर्वेक्षण वाहनांमार्फत मुंबईतील जास्तीत जास्त वाहतूक बेटांवर, नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने वायू गुणवत्ता सर्वेक्षण करण्यासाठी तसेच स्थिर CAAQMS स्थानकाजवळ वायू सर्वेक्षणाची फेर तपासणीसाठी निश्चितच अधिक सोयीचे ठरणार आहे. (BMC))
(हेही वाचा- भारतातील ५ प्रभावशाली महिला)
स्वयंचलित वायू सर्वेक्षण फिरत्या वाहनांची उद्दिष्ट्ये
-बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्थाननिहाय वायू गुणवत्तेची वर्तमान स्थितीविषयक अचूक माहिती (Real Time Information )उपलब्ध करून देणे.
-मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषण समस्येवर उपाययोजना शोधण्याच्या प्रक्रियेत सहभाग.
-हवामान विषयक घटक उदा. तपमान, हवेतील सापेक्ष आद्रता, वाऱयाचा वेग व दिशा इत्यादी बाबत माहिती उपलब्ध करून देणे.
-प्रदूषण नियंत्रणास सुलभता निर्माण करून स्वच्छ व हरित मुंबईचे स्वप्न साकार होण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community