लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने ५० लाख कर्मचारी आणि ६२ लाख निवृत्तीवेतनधारकांना खुश केले आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए (DA Hike) आणि डीआरमध्ये ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. होळीच्या आधी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तिजोरी उघडली आहे. लाखो कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
(हेही वाचा – LPG Cylinder : एलपीजी सिलिंडरवर मिळणारे अनुदान एका वर्षासाठी वाढवले)
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५० टक्के महागाई भत्ता (DA Hike) आणि २ महिन्यांच्या थकबाकीसह ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर त्यांचा डीए आता ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. तो १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल. त्यांचे वेतन मार्च २०२४ मध्ये नवीन डीएसह दिले जाईल. सरकारने जानेवारीपासून डीए वाढीला मंजुरी दिली आहे. तुम्हाला दोन महिन्यांचा वाढीव कालावधी देखील मिळेल. म्हणजेच, जेव्हा तुमचा पगार मार्चमध्ये येईल, तेव्हा त्यात वाढीव डीए आणि दोन महिन्यांच्या थकबाकीचा समावेश असेल.
(हेही वाचा – Sunil Tatkare : जागावाटपाबाबत मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून चर्चा झालेली नाही; सुनील तटकरे म्हणाले…)
#WATCH | Union Cabinet approves hike in Dearness Allowance to govt employees and Dearness Relief to pensioners by 4% from January 1, 2024, announces Union Minister Piyush Goyal. pic.twitter.com/IsWUnwBGHW
— ANI (@ANI) March 7, 2024
डीए वाढल्यानंतर पगारात किती वाढ होणार?
महागाई भत्ता सामान्यतः वर्षातून दोनदा सुधारित केला जातो. डीए (महागाई भत्ता) (DA Hike) जानेवारी आणि जुलै महिन्यात सुधारित केला जातो. यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्यात आला. आता तो ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातही वाढ होईल.
(हेही वाचा – Mohammad Qasim Gujjar : दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड महंमद कासिम गुज्जर दहशतवादी म्हणून घोषित)
या निर्णयांनाही मान्यता देण्यात आली आहे :
मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना पीयूष गोयल म्हणाले की, मंत्रिमंडळाने ५ वर्षांसाठी १०३७१.९२ कोटी रुपयांच्या खर्चासह ‘इंडिया एआय मिशन’ला मंजुरी दिली आहे. तागाच्या दराबाबतही मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला. त्यांनी सांगितले की, गेल्या १० वर्षात तागाच्या एमएसपीमध्ये १२२ टक्के वाढ झाली असून, त्याचा फायदा ४४ लाख ताग उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचा फायदा विशेषतः भारतातील पूर्वेकडील प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि ओरिसा येथील शेतकऱ्यांना होणार आहे. (DA Hike)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community