- ऋजुता लुकतुके
भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) धरमशाला कसोटी दरम्यान क्षेत्ररक्षणातील एक अनोखा विक्रम केला आहे. यष्टीरक्षक सोडल्यास तो असा पहिला क्षेत्ररक्षक आहे ज्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा सर्व प्रकारात किमान ६० झेल टिपले आहेत. धरमशालामध्ये अश्विनच्या चेंडूवर स्लिपमध्ये रोहितने मार्क वूडचा झेप टिपला. हा त्याचा साठावा कसोटी झेल होता. (Ind vs Eng 5th Test)
आता रोहितने (Rohit Sharma) कसोटीत ६०, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९३ आणि टी-२० प्रकारात ६० झेल टिपले आहेत. रोहितने वूडला बाद केलं तो इंग्लिश संघाचा आठवा बळी होता. त्यानंतर इंग्लिश संघ २१८ धावांत गुंडाळला गेला. कुलदीपने ५, अश्विनने ४ तर जडेजाने १ बळी मिळवला. (Ind vs Eng 5th Test)
Greatest fielder the game of cricket ever witnessed – Sir Rohit Sharma 🐐 https://t.co/uHexL5NMPZ pic.twitter.com/eEBGEMGM1Q
— Rohitified (@Pnicogen45) March 7, 2024
(हेही वाचा – Newly Developed Casualty Department: कल्याण रेल्वे स्थानकाजवळ नव-विकसित आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाचे उद्घाटन)
विराट कोहलीने आतापर्यंत टिपले इतके झेल
भारतीय संघाला आत धरमशाला इथंही पहिल्या डावात मोठी धावसंख्या रचून इंग्लिश संघाचा मोठ्या फरकाने पराभव करण्याची संधी आहे. आतापर्यंत या कसोटीचा पहिला दिवस तरी भारतीय संघाने गाजवला आहे. (Ind vs Eng 5th Test)
फक्त कसोटीचा आढावा घेतला तर सर्वाधिक झेल हे दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज मार्क बाउचरच्या नावावर जमा आहेत. त्याने तब्बल ५३२ झेल घेतले आहेत. तर यष्टीरक्षका व्यतिरिक्त सर्वाधिक झेल हे भारताच्या राहुल द्रविडच्या नावावर आहेत. त्याने २१० झेल टिपले आहेत. तर कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० धरुन सर्वाधिक झेल हे ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या नावावर आहेत. त्याने ५६० सामन्यांत ३६४ झेल टिपले आहेत. भारतात सर्वाधिक झेल राहुल द्रविडने (३३४) घेतले आहेत. त्याच्या खालोखाल विराट कोहलीने आतापर्यंत ३१४ झेल टिपले आहेत. (Ind vs Eng 5th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community