काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरातील १५० लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यानंतर पुढच्या टप्प्यातील उमेदवारांची यादीदेखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा – Women Entrepreneurship : भारतात ६३ टक्के महिलांना उद्योजकतेची ओढ)
महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश पहिल्या यादीत करण्यात आलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील यादीत महाराष्ट्रातील काही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादृष्टीने महायुतीतील जागा वाटपाचा तिढा देखील सुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – PM मोदींच्या हस्ते देशभरातील डिजिटल क्रिएटर्सचा गौरव! पहिल्यांदाच कोणाला मिळाले पुरस्कार; वाचा सविस्तर)
याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करणार आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री यांना तत्काळ दिल्लीला बोलवलं असून जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – बोगस कागदपत्रे तयार करून MMRDA ची घरे लाटण्याचा प्रयत्न; ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १२ जणांना अटक)
महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला मेळावा व अन्य उपक्रमांचे लोकार्पण
🗓️ 08-03-2024 📍 कोल्हापूर
https://t.co/al2A2a6HR9— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 8, 2024
काय म्हणाले हसन मुश्रीफ ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज म्हणजेच शुक्रवार ८ मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी हातकणंगले तालुक्यातील कोरोचीमध्ये महिला मेळावा त्यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमात बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री यांना तत्काळ दिल्लीला बोलवलं असून जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Bandra Worli Sea Link : अफाटतेचे आणि सुंदरतेचे मूर्त स्वरुप)
जागा वाटपाबाबत दिल्लीत शुक्रवार ८ मार्च रोजी रात्री महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दिल्लीमध्ये अमित शाह, जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community