Mahashivratri : महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत विजेचा धक्का बसून १४ मुले गंभीर जखमी

जखमींपैकी एक मुलगा 70 टक्के, तर दुसरा 50 टक्के भाजला आहे. उर्वरित मुले 10-15 टक्के भाजली आहेत.

235

महाशिवरात्रीचा (Mahashivratri) उत्सव सध्या देशभर उत्साहात साजरा केला जात असताना राजस्थानमध्ये मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे. येथील कोटामध्ये महाशिवरात्री दिनी भगवान शिवाच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागल्याने सुमारे 14 मुले गंभीररित्या भाजली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुन्हडी थर्मल चौकाजवळ ही घटना घडली.

(हेही वाचा Mahashivratri 2024 : महाशिवरात्री का साजरी केली जाते? काय आहे धार्मिक महत्व?)

मिरवणुकीत 9 ते 16 वयाच्या मुलांचा सहभाग 

स्थानिकांनी तात्काळ जखमी मुलांना रुग्णालयात नेले. अपघाताची माहिती जखमी मुलांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनीदेखील रुग्णालयाकडे धाव घेतली. सर्व जखमी मुलांना उपचारासाठी एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि ऊर्जा मंत्री हिरालाल नागर यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी मुलांची भेट घेटली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींपैकी एक मुलगा 70 टक्के, तर दुसरा 50 टक्के भाजला आहे. उर्वरित मुले 10-15 टक्के भाजली आहेत. सर्वांचे वय 9 ते 16 वर्षे दरम्यान आहे. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या मिरवणुकीत 20-25 लहान मुले आणि महिला-पुरुषांचा समावेश होता. यामध्ये एका मुलाच्या हातात 20 ते 22 फूट लांबीचा लोखंडी पाईप होता, जो वर हाय टेंशन वायरला चिटकल्याने विद्युत प्रवाह पसरला आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर मुलांनाही विजेचा जोरदार धक्का लागून ते भाजले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.