- ऋजुता लुकतुके
बीसीसीआयने गुरुवारी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या १०,००० कसोटी धावांचा वाढदिवस धरमशाला इथं केक कापून साजरा केला. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) हे कसोटीच्या इतिहासात १०,००० धावांचा टप्पा गाठणारे पहिले फलंदाज आहेत. ७ मार्च १९८७ हा तो दिवस होता, जेव्हा गावसकर यांनी १०,००० धावांचा टप्पा ओलांडला होता. आज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) ७१ वर्षांचे आहेत. आणि अजूनही समालोचनाच्या निमित्ताने क्रिकेटशी जोडलेले आहेत. गुरुवारी ते धरमशालाच्या समालोचन कक्षात पोहोचले तेव्हा त्यांच्यासाठी एक खास सरप्राईज होतं.
‘धीस डे दॅट ईयर,’ असं लिहून केकवर पुढे तारीखही लिहिलेली होती. या अनपेक्षित सोहळ्यामुळे गावसकर आनंदून गेले. आणि त्यांनी त्या दिवसाची आठवण उपस्थित लोकांसमोर जागवली.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘दिल्ली’ गाठणार; जागावाटपाचा तिढा सुटणार ?)
#OnThisDay in 1987, the legendary Sunil Gavaskar became the first cricketer to complete 1⃣0⃣0⃣0⃣0⃣ Test runs 👏 👏
Today, in the Comm Box, he celebrated that special moment in style 🎂#TeamIndia pic.twitter.com/dtFHo4ZuC3
— BCCI (@BCCI) March 7, 2024
सुनील यांनी यावेळी अश्विनचाही गौरवाने उल्लेख केला. ‘अश्विन आपला शंभरावा कसोटी सामना खेळत आहे. आणि त्याच दिवशी काही वर्षांपूर्वी कसोटीत १०,००० धावा पूर्ण झाल्या होत्या. हा दिवसच कसोटी क्रिकेटसाठी ऐतिहासिक आहे,’ असं गावसकर यावेळी म्हणाले.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी आपल्या कारकीर्दीत १२५ कसोटी सामन्यांत १०,१२२ धावा जमवल्या. आणि यात ३४ शतकं तर ८० अर्धशतकांचा समावेश होता. सुनील गावसकर यांच्या नावावर तेव्हा कसोटींत सर्वाधिक शतकांचा विक्रमही होता, जो पुढे जाऊन सचिन तेंडुलकरने मोडला. सचिनने कसोटींत ५१ आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत. १९८७ मध्ये गावसकर यांनी पहिल्यांदा १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर आतापर्यंत एकूण १४ फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या आणखी २ भारतीय फलंदाजांचाही समावेश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community