GST Receipt Fraud : बनावट जीएसटी पावत्यांद्वारे २५.७३ कोटींची फसवणूक प्रकरणी एकाला अटक

तपासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे किरण कंथारिया याला ६ मार्च रोजी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ च्या कलम ६९ च्या तरतुदींनुसार केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ च्या कलम १३२ चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली.

543
Navi Mumbai: बनावट नोटांच्या छापखान्यावर धाड घालून तरुणावर गुन्हा दाखल, २ लाखांच्या नोटा जप्त

मुंबई क्षेत्रातील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या पालघर आयुक्तालयाच्या तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी एका बनावट पावत्या (GST Receipt Fraud) तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने २५.७३ कोटी रुपये रकमेवर बेकायदेशीर इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळवला होता आणि तो मंजूरही करून घेतला होता. या प्रकरणी किरण कंथारिया यांना ६ मार्च रोजी अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Atal Setu वर कारवाईचा धडाका; वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या २ हजार चालकांवर कारवाई)

हॅकनअप ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध तपास सुरू :

गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हॅकनअप ट्रेडिंग (OPC) प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध तपास सुरू करण्यात आला होता. (GST Receipt Fraud) तपासादरम्यान ही कंपनी अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले. उपरोक्त कंपनीचे संचालक नीलेश बी. शहा यांनी किरण कंथारिया आणि मनीष शहा यांच्या सूचनेनुसार हॅकनअप ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर अनेक बनावट कंपन्या तयार करण्यात आपला हात असल्याची कबुली दिली होती. या बनावट कंपन्या बेकायदेशीर इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळवणे आणि तो मंजूर करुन घेणे यात सहभागी होत्या.

(हेही वाचा – ED चा रोहित पवारांना धक्का; कन्नड साखर कारखान्याची १६१ एकर जमीन जप्त)

किरण कंथारिया याने फसव्या कंपन्या तयार केल्या :

किरण कंथारियाचा (GST Receipt Fraud) शोध घेण्यात आला आणि ६ मार्च रोजी त्याचा जबाब नोंदवण्यात आला. किरण कंथारिया याने आपण बेकायदेशीर इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळवणे आणि तो मंजूर करुन घेण्याच्या उद्देशाने बनावट पावत्या तयार करण्यात गुंतलेल्या अनेक बनावट कंपन्या स्थापन करण्यात सहभागी आहोत, अशी कबुली या जबाबात दिली. मनीष शहा यांच्या निर्देशानुसार तो वर उल्लेखित फसव्या कंपन्या तयार करत असे, असे कंथारिया याने पुढे सांगितले.

पुढे, असेही आढळून आले की किरण कंथारिया यांने तयार केलेल्या बनावट कंपन्यांनी वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता बनावट पावत्यांच्या बळावर ११.०२ कोटी रुपये रकमेवर बेकायदेशीर इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मंजूर करुन घेतला तर १४.१७ कोटी रुपये रकमेवर बेकायदेशीर (GST Receipt Fraud) इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला.

(हेही वाचा – South Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबईतून नार्वेकरांना निवडणूक जाणार जड)

तपासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे किरण कंथारिया याला ६ मार्च रोजी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ च्या कलम ६९ च्या तरतुदींनुसार केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ च्या कलम १३२ चे उल्लंघन (GST Receipt Fraud) केल्याबद्दल अटक करण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.