State Council of Agricultural Education and Research : राज्य कृषी शिक्षण परिषदेच्या सदस्यपदी विनायक काशीद

राज्यपाल रमेश बैस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काशीद यांची निवड केली आहे.

270
कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशीद यांची राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या (State Council of Agricultural Education and Research) सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. राज्यपाल रमेश बैस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काशीद यांची निवड केली आहे. कृषी उद्योजक या विभागातून अशासकीय सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शेती प्रश्नांवर विविध संशोधन

राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद (State Council of Agricultural Education and Research), पुणे ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या चारही कृषी विद्यापीठांमध्ये समन्वय आणि सुसूत्रतेसाठी कार्यरत आहे. कृषी परिषदेच्या (State Council of Agricultural Education and Research) माध्यमातून काशीद कृषी विद्यापीठात विनायक काशीद हे नावीन्यपूर्ण उपक्रम, शेती प्रश्नांवर विविध संशोधन, शेती समस्यांच्या उपाययोजना अशा मुद्द्यांवर कृषिमंत्री आणि परिषदेच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने समन्वय आणि मार्गदर्शनाचे काम पाहतील. काशीद हे गेल्या वीस वर्षांपासून शेती क्षेत्राशी निगडित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधनपर उपक्रमात कार्यरत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ कृषी विद्यापीठांना होईल. काशीद यांचे मूळ गाव गव्हाण (ता. तासगाव) आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.