Khotachi Wadi : गिरगाव खोताची वाडीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र झाले सुरु

केसरकर, लोढा यांच्या हस्ते झाले प्रशस्त विरंगुळा केंद्राचे लोकार्पण

961
Khotachi Wadi : गिरगाव खोताची वाडीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र झाले सुरु
Khotachi Wadi : गिरगाव खोताची वाडीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र झाले सुरु
विशेष प्रतिनिधी,मुंबई

गिरगावमधील खोताची वाडी येथील विठ्ठलभाई पटेल मार्ग येथे उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी ७ मार्च २०२४ रोजी झाले. सेवा सहयोग फाऊंडेशनमार्फत या विरंगुळा केंद्राचे व्यवस्थापन केले जाणार आहे. एकटेपणातून बाहेर पडून इतर ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंदाने वेळ घालवणे, हा या विरंगुळा केंद्राचा उद्देश आहे.

कुटुंबातील ज्येष्ठांना अडचणी येवू नयेत म्हणून…

मुंबईत अनेक कुटुंब लहान क्षेत्रफळाच्या घरात एकत्र राहतात. त्यामुळे अशा कुटुंबातील ज्येष्ठांना अडचणी येवू नयेत यासाठी खोताची वाडी परिसरात प्रशस्त विरंगुळा केंद्र सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महानगरपालिकेला दिले होते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी याबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार खोताची वाडी (Khotachi Wadi) येथील विठ्ठलभाई पटेल मार्ग येथे हे विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आले आहे. (Khotachi Wadi)

(हेही वाचा – South Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबईतून नार्वेकरांना निवडणूक जाणार जड)

सुमारे ४० ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात विश्रांती करू शकतील

वय ६० वर्ष आणि त्यावरील वयोगटातील महिला व पुरूषांसाठी जवळपास २ हजार चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेत हे विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आले आहे. एकाचवेळी सुमारे ४० ज्येष्ठ नागरिक या विरंगुळा केंद्रात विश्रांती करू शकतील. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. प्राथमिक स्तरावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विरंगुळा केंद्र सुरू राहणार आहे. ज्येष्ठांच्या प्रतिसादानुसार वेळेत बदल करण्यात येणार आहे.

कॅरम – बुद्धिबळासारखे बैठे खेळ, वाचनासाठी पुस्तके…

सेवा सहयोग फाऊंडेशनमार्फत या विरंगुळा केंद्राचे व्यवस्थापन केले जाणार आहे. एकटेपणातून बाहेर पडून इतर ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंदाने वेळ घालवणे, हा या विरंगुळा केंद्राचा उद्देश आहे. ६० वर्ष आणि त्यावरील वयोगटातील महिला व पुरूषांसाठीच्या या विरंगुळा केंद्रात विश्रांती घेण्यासह कॅरम – बुद्धिबळासारखे बैठे खेळ, वाचनासाठी पुस्तके – मासिके, मनोरंजनासाठी दूरदर्शनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Khotachi Wadi)

महापालिका नेहमीची आघाडीवर

ज्येष्ठ नागरिकांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिल्‍याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याप्रसंगी केले. यावेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि श्री. दीपक केसरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसमवेत कॅरम खेळण्याचा आनंद लुटला. या सोहळ्याला महानगरपालिकेच्याा संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (Khotachi Wadi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.