या समस्या कमी करण्यासाठी आपण हायड्रेटेड राहणे आणि पोषकघटकांनी युक्त असलेली पेये पिणे महत्वाचे आहे. आज आपण या समस्या कमी करण्यासाठी महत्वाच्या आणि आरोग्यदायी असणाऱ्या काही हेल्दी ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत.
दूध दुधाला कॅल्शिअम आणि प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत म्हणून ओळखले जाते. दुधामध्ये कॅल्शिअमसोबतच, व्हिटॅमिन्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या विकासासाठी दूध अतिशय फायदेशीर मानले जाते.