North-East Mumbai lok Sabha : ईशान्य मुंबईत मानखुर्द शिवाजीनगरमधील मते ठरणार बोनस पॉईंट

मनोज कोटक दुसऱ्यांदा ईशान्य मुंबईत निवडणूक लढवण्यासाठी सज्ज

1013
North-East Mumbai lok Sabha : ईशान्य मुंबईत मानखुर्द शिवाजीनगरमधील मते ठरणार बोनस पॉईंट
North-East Mumbai lok Sabha : ईशान्य मुंबईत मानखुर्द शिवाजीनगरमधील मते ठरणार बोनस पॉईंट
विशेष प्रतिनिधी,मुंबई

उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार (North-East Mumbai lok Sabha) संघ हा भाजपसाठी सर्वांत सुरक्षित मतदार संघ मानला जात असला तरी या मतदार संघातील मानखुर्द शिवाजी नगर या भागातील मतदान हे भाजपसाठी बोनस पॉईंट ठरणार आहेत. या मतदार संघात घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि मुलुंड हे तीन मतदार संघ भाजपकडे असले तरी दोन मतदार संघ हे शिवसेना आणि एक समाजवादी पक्षाकडे आहे. त्यामुळे भाजपने मानखुर्द शिवाजी नगरमध्येही आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. या मतदार संघात मागील वेळेस कमी पडलेल्या मतांच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत या मतदार संघात सर्वांधिक मते मिळवण्यासाठी भाजपने चांगलीच रणनिती आखली असून शिवसेनेच्या मदतीने भाजप यंदा ही किमया साधणार असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे.

कोटक यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपने विद्यमान किरीट सोमय्या यांचा पत्ता शिवसेनेच्या सांगण्यानुसार कापून महापालिकेचे गटनेते असलेल्या मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सन २०१९च्या लोकसभा मतदार संघातून मनोज कोटक हे निवडून आले. त्यामुळे आगामी २०२४च्या लोकसभा मतदार संघातून कोटक यांचा पत्ता कापून अन्य कुणाची वर्णी लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा होती. परंतु काही दिवसांपूर्वी घाटकोपर पूर्व येथे लोकसभा मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घटन करण्यात आले. त्यामुळे कोटक यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. मात्र, कोटक यांनी उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता सहाही विधानसभा मतदार संघातून फिरुन आपली कामे सुरुच ठेवत जनसंपर्क अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. (North-East Mumbai lok Sabha)

पाच वर्षांत भाजपने चांगले प्रस्थ निर्माण केले

विक्रोळी आणि भांडुप या दोन मतदार संघात शिवसेनेचे अनुक्रमे सुनील राऊत आणि रमेश कोरगावकर हे आमदार असले तरी हे दोन्ही आमदार हे भाजपच्या पाठबळावरच निवडून आलेले आहे. या दोन्ही विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे आठ नगरसेवक होते. त्यातील तीन नगरसेवक हे शिंदे यांच्या शिवसेनेत आले आहेत. तर भाजपचेही नगरसेवक असून या दोन्ही मतदार संघात मागील पाच वर्षांत भाजपने चांगले प्रस्थ निर्माण केले आहे. फक्त या लोकसभा मतदार संघात मानखुर्द शिवाजीनगर या विधानसभा क्षेत्र डोकेदुखी ठरत आहे. हा मतदार संघ समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघातील समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवक अख्तर कुरेशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अख्तर कुरेशी यांनी शिवसेनेत प्रवेश करणे हेच मोठे आव्हान असून त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला या मतदार संघात आपले खाते खोलता येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (North-East Mumbai lok Sabha)

(हेही वाचा – Khotachi Wadi : गिरगाव खोताची वाडीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र झाले सुरु)

माजी मुस्लिम नगरसेवकांच्या जोरावर

मात्र, याबरोबरच दोन दिवसांपूर्वी गोवंडी येथील शिवाजीनगर नागरी आरोग्य केंद्र व प्रसुतीगृह भेट देऊन या आरोग्य केंद्रामध्ये एनआयसीयू, प्रसुतीगृह नियमित सुरु ठेवणे आणि इमर्जन्सी वॉर्ड चालू ठेवण्याबाबत पाहणी करून स्थानिकांची मागणी जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी अपक्ष नगरसेवक सिराज शेख हेही होते. त्यामुळे शिवसेना पक्षात सामील झालेले काही माजी मुस्लिम नगरसेवकांच्या जोरावर भाजप याठिकाणी आपले पाय मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपसाठी ही मते बोनस पॉईँट

अख्तर कुरेशी हे एक माजी नगरसेवक शिवसेनेत आले असून समाजवादी पक्षांचे तसेच तर लोक प्रतिनिधीही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणे अशक्य असल्याने ते सर्व शिवसेनेत प्रवेश करतील आणि त्यामाध्यमातून भाजपचे या मतदार संघातील प्राबल्य युतीच्या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे भाजप मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघातील समाजवादी पक्षाच्या अन्य माजी नगरसेवक व पदाधिकारी यांना गळाला लावून शिवसेनेत प्रवेश घेण्यास भाग पाडत आहे, जेणेकरून भाजपला या मतदार संघातून काही प्रमाणात मते मिळतील आणि ही मते बोनस पॉईँट ठरणार असल्याने भाजपने ही रणनिती आखल्याचे बोलले जात आहे. (North-East Mumbai lok Sabha)

भाजप उमेदवाराला अशी होईल मदत

मागील लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने आपल्याला मदत केली होती,असे कोटक यांनी जाहीरपणे सांगितले होते. परंतु त्यावेळी भाजपला उघडपणे मतदान करा म्हणून आवाहन करता येत नसल्याने यावेळेस शिवसेच्या मदतीने भाजपला मतदान करण्यासाठी माजी नगरसेवक सक्रिय होऊन मतदारांना आवाहन करू शकतील असे बोलले जात आहे. (North-East Mumbai lok Sabha)

हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.