स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) आणि भागोजीशेठ कीर (Bhagoji Keer) यांचे कार्य प्रेरणादायी आहे. पण या थोर पुरुषांना समाजापूरते मर्यादित ठेवण्यात आले, ही घोर शोकांतिका असून यामुळे भावीपिढीसमोर चुकीचा संदेश जाऊ शकतो. या दोन्ही थोर पुरुषांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला तो केवळ समाजापूरता मर्यादित नव्हता तर पूर्ण देशासाठी होता, असे मत दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) राष्ट्रीय स्मारक आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) राष्ट्रीय स्मारक इमारतीत स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) आणि भागोजी कीर (Bhagoji Keer) यांच्या अर्ध-पुतळ्याचे अनावरण दीपक केसरकर यांच्या हस्ते ८ मार्च रोजी करण्यात आले. त्यावेळी शेवाळे बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Veer Savarkar), भागोजी कीर यांचे नातू अंकुर कीर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, अविनाश महाराज, प्रा. प्रदीप ढवळ उपस्थित होते.
संतांनादेखील जातीपातीत विभागले
शेवाळे यांनी समाजा-समाजात होत असलेल्या संघर्षाबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “आज समाजात थोर पुरुषांनाच नाही तर संतांनादेखील जातीपातीत विभागले जात आहे, हे चित्र राजकीयदृष्ट्या घातक आहे. हे संपायला हवे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) आणि भागोजीशेठ कीर (Bhagoji Keer) यांनी जे कार्य केले, स्वातंत्र्यलढा दिला तो केवळ एका समाजासाठी नाही, तर देशासाठी, देशातील प्रत्येक नागरिकासाठी दिला. त्यामुळे यांची जयंती ही प्रत्येक समाजाने साजरी केली पाहिजे आणि हाच यांच्या कार्याचा सन्मान असेल. कीर यांचे स्मारक भव्य उभारू जे पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल,” असे शेवाळे म्हणाले.
शेवाळे यांनी भंडारी समाजाने निवडणुकीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच हे सहकार्य पुढे मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community