Supriya Sule म्हणाल्या ‘भाजपा हा एक सुसंस्कृत पक्ष’

312

दररोज सकाळी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यावर बेमालूम टीका करणाऱ्या शिवसेना उबाठाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (शप) नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज शुक्रवारी ८ मार्चला पुण्यात भाजापाचे कौतुक करत “भाजपा हा एक सुसंस्कृत पक्ष आहे”, असे प्रमाणपत्र दिले.

गडकरी हे फक्त राज्याचे नाही तर देशाचे मोठे नेते

कॉँग्रेस-राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना उबाठा यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाचे कौतुक केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीतून निवडणूक लढविण्याची ऑफर दिली. यावर प्रतिक्रिया विचारली असता सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “गडकरी हे फक्त राज्याचे नाही तर देशाचे मोठे नेते आहेत. आणि अतिशय सुसंस्कृत नेतृत्व आहेत. आणि ते ‘आरिजिनल’ भाजपामधील आहेत. ही खरंच सुसंस्कृत पार्टी आहे. आता त्या पक्षाला काय झाले आहे मला कळेना.”

(हेही वाचा Sharad Pawar : शरद पवारांची ‘दादा’गिरी नक्की कुणावर?)

संसदेचे कामकाज आम्ही सुषमाजी आणि अरुणजीकडून शिकलो

त्या पुढे म्हणाल्या, “इतके चांगले मोठे नेते त्या पक्षात, म्हणजे अटलजी, अडवाणीजी, सुषमा स्वराज, अरुण जेटली किती नावे घेऊ. मीही संसदेत भाषणे करायला, सुषमाजी, अरुणजी, ककुणाकुणाची नावे  घेऊ. एवढी उत्तम भाषणे असायची. संसदेचे कामकाज आम्ही सुषमाजी आणि अरुणजीकडून शिकलो. गेली १५-१८ वर्षे मी दिल्लीत संसदेत काम करते. संसदेलाच नाही तर देशाला गडकारींसारख्या मोठ्या नेत्यांची गरज आहे. ते कधीही विरोधकांना ‘शत्रू’ समजत नाही. ते लोकशाहीवर विश्वास ठेवणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल आयुष्याभर आमच्या मनात मान, सन्मान आणि आदरच राहील,” असे सुळे (Supriya Sule)  म्हणाल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.