Maadhavi Latha : ओवैसींच्या विरोधात लढणार भाजपच्या माधवी लता; मुसलमानांविषयी म्हणतात…

354
Maadhavi Latha : ओवैसींच्या विरोधात लढणार भाजपच्या माधवी लता; मुसलमानांविषयी म्हणतात...
Maadhavi Latha : ओवैसींच्या विरोधात लढणार भाजपच्या माधवी लता; मुसलमानांविषयी म्हणतात...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत २८ महिलांचा समावेश आहे. त्यांपैकी माधवी लता यांच्या नावाची चर्चा होत आहे. ‘संघाची कन्या’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधवी लता हैदराबाद लोकसभा मतदारसंघात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम, MIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या विरोधात शड्डू ठोकणार आहेत. १९८४ पासून या जागेवर एमआयएमचे एकहाती वर्चस्व आहे. (Maadhavi Latha)

(हेही वाचा – Film City Mumbai : काय आहे फिल्म सिटी मुंबईचा इतिहास?)

ओवैसींच्या बालेकिल्ल्यात भाजपने उमेदवारी दिलेल्या माधवी लता या पारंपरिक भारतीय महिला, उद्योजक, रुग्णालय प्रशासक व प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना अशीही त्यांची ओळख आहे. ४९ वर्षीय माधवी लता यांनी उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. रा. स्व. संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रमुख, वरिष्ठ रा.स्व. संघ नेते इंद्रेश कुमार यांच्याशी माधवी लता यांचे जवळचे संबंध आहेत. इंद्रेश कुमार यांच्याकडे त्या एक मार्गदर्शक म्हणून पाहतात. त्यामुळेच त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.

बहुचर्चित हैदराबाद लोकसभा मतदारसंघ एआयएमआयएमचा बालेकिल्ला आहे. सलाहुद्दीन ओवैसी यांनी १९८४ ते १९९९ या काळात ही जागा जिंकली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा असदुद्दीन ओवैसी हे या मतदारसंघातून जिंकत आहेत. हैदरबादमध्ये लोकसभेच्या अंतर्गत येणारा एक विधानसभा मतदारसंघ सोडल्यास उर्वरित सर्व मतदारसंघ एआयएमआयएमकडे आहेत. विधानसभेसाठीही केवळ गोशामहल मतदारसंघ भाजपाकडे आहे. तिथे जिथे भाजपाचे टी. राजा सिंह आमदार आहेत.

जातीय दंगली माझ्यासाठी त्रासदायक – माधवी लता

“हिंदू-मुस्लिम हा माझा निवडणूक मुद्दा असता, तर भाजपाने मला अजिबात निवडले नसते. पक्षाला माहीत आहे की, मी अनेक मुस्लिमांसोबत काम करते आणि मला त्यांच्याबद्दल आपुलकी आहे. मी तिहेरी तलाकवर कठोर भूमिका घेतली होती. जर मी मंदिरासाठी उपोषण करू शकत असेन, तर मी मुस्लिम महिलांसाठीही तसेच करेन. माझा नेहमीच वेगवेगळ्या संस्कृतींशी परिचय होता. १९८० च्या दशकात झालेल्या जातीय दंगली माझ्यासाठी त्रासदायक होत्या. कोणाचा तरी जीव घेऊन लोक आपला द्वेष का व्यक्त करीत असतील, असा प्रश्न त्यावेळी मला पडला होता. आज अनेक वर्षांच्या अनुभवानंतर मला जाणवतेय की, यामागे सामान्य माणूस नसून, एक राजकीय खेळ आहे.

सामान्य माणसाला मग तो हिंदू असो किंवा मुस्लिम; त्यांना हिंसा नको असते. एका हिंदूला सामान्य मुस्लिमांमुळे नाही, तर सत्तेवर असलेल्या आणि दोन समुदायांमध्ये शांतता नको असलेल्या मुस्लिम पुरुषांमुळे त्रास होत आहे, अशी परखड टीका त्यांनी ओवैसी बंधूंवर केली आहे.

मी जुन्या शहरातील प्रत्येक चौकात प्रचार करीन आणि माझ्यावर एक दगड जरी फेकला गेला, तरी असदुद्दीन त्याला उत्तरदायी असतील, असा इशारा त्यांनी ओवैसी यांना दिली आहे.

मतदान प्रक्रियेचे लाइव्ह प्रक्षेपण करा

माधवी लता यांनी या वेळी मागणी केली आहे की, मी निवडणूक आयोगाला विनंती करते की, मतदान प्रक्रियेच्या लाइव्ह प्रक्षेपणाला परवानगी द्यावी आणि पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त तैनात करावा. दोन लाखांहून अधिक हिंदू मतदारांना मतदार यादीतून हटवण्यात आले आहे. चार दशकांपासून ही प्रथा आहे. देशाला वाटते की, ओल्ड सिटी भागात मुस्लिमांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे असदुद्दीन जिंकत आले आहेत. मला असदभाईंना (असदुद्दीन ओवैसी) सांगायचे आहे की, तुमच्यामुळे ज्यांना त्रास सहन करावा लागला, त्या सर्व समुदायातील लोकांकडून मला मते मिळतील. मी माझ्या आयुष्याच्या मिशनवर आहे. (Maadhavi Latha)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.