जागावाटपावर गृहमंत्री अमित शाहांच्या (Amit Shah) निवासस्थानी रात्रभर खलबतं सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक मध्यरात्री १ वाजेपर्यंत बैठक सुरु होती. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतही शाहांची अर्धातास स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.लोकसभेच्या जागावाटपा संदर्भात भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा बदल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची काही तिकीट कापण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा- Article 370 : ‘आर्टिकल 370’ चित्रपट छत्तीसगडमध्ये टॅक्सफ्री)
जागा बदली सोबत उमेदवार देखील बदला…
भाजपा (BJP) ही निवडणुकीच्या काळात फक्त सक्रिय न राहता निवडणुकीच्या आधीपासून सक्रिय असते. भाजपाच्या (BJP) वतीने महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागांचा अंतर्गत सर्वे करण्यात आला होता. या सर्वे मध्ये शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या काही जागांवरती सध्या असलेले उमेदवार पुन्हा दिल्यास ते निवडून येऊ शकत नाहीत असे सर्वे मधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शुक्रवारी उशिरा रात्री झालेल्या अमित शहा यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना काही उमेदवार बदलण्यासंदर्भात देखील सांगण्यात आले आहे. केंद्रीय भाजपाच्या नेतृत्वाने केलेल्या निवडणूक पूर्व सर्वे मधून भाजपाच्या एकंदर डझनभर उमेदवार बदलणार असल्याचे समोर आले आहे. देशभरातन ४०० पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याच्या संकल्पनेसाठी हे करणे अत्यंत आवश्यक असल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले आहे.सध्या लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबतं सुरु असल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याची केल्याची सूचना गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. काही उमेदवार बदलण्याबाबत शाह यांनी सूचना केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शिवसेनेच्या काही उमेदवारांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना साशंकता असल्याचं समजत आहे. अजित पवार मात्र जागा वाढवण्याची मागणी करत असल्याचं सांगितलं जात आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा- Ind vs Eng 5th Test : राहुल द्रविड बरोबरच्या १५ मिनिटांच्या चर्चेनं पड्डिकलवर केली जादू )
शिंदे-पवार गटाला नक्की किती जागा मिळणार ?
अजित पवारांना (Ajit Pawar) तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला १० ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे. वायव्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, रामटेक, पालघर, हातकणंगले या जागा भाजप स्वतःकडे घेऊ शकते, अशी सुत्रांची माहिती आहे. अजित पवार गटाला बारामती, शिरुर, रायगड, परभणी या जागा मिळू शकतात, तर शिर्डी आणि यवतमाळचे उमेदवार बदलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community