Udhhav Thackeray : उद्धवजी ! या जन्मात तुम्हाला नितीनजी कळणे कठीण !

Udhhav Thackeray : नितीन गडकरी हे भाजपच्या सर्व नेत्यांसाठी आदर्शवत असल्याने त्यांचा पक्षामध्ये आदरयुक्त दरारा आहे. तो दरारा भयापोटी नाही, तर कार्यामुळे आहे.

475
Udhhav Thackeray : उद्धवजी ! या जन्मात तुम्हाला नितीनजी कळणे कठीण !
Udhhav Thackeray : उद्धवजी ! या जन्मात तुम्हाला नितीनजी कळणे कठीण !

श्याम मो . देशपांडे, वर्धा

‘समजा तशी वेळ आलीच तर शिवसेनेचे दुकान बंद करेल; पण कदापी काँग्रेसमध्ये जाणार नाही व हात मिळवणी करणार नाही’ या आणि अशा आशयाचे विधान करणारे कट्टर हिंदुत्ववादी हिंदूह्रयसम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे राजकारण, समाजकारण आणि हिंदुत्वविषयक धोरण आजपर्यंत न समजलेल्या व पदासाठी केवळ लाचारी पत्करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राष्ट्र ज्यांच्याकडे सन्मानाने आणि केवळ आदरानेच नव्हे, तर दिलेला शब्द प्रामाणिकपणाने पाळणारा नेता म्हणून पहाते त्या आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) ‘महाविकास आघाडीत या निवडून आणतो’ अशी ऑफर देणे म्हणजे त्यांना नितीन गडकरी समजलेच नाही, याची साक्ष आहे. (Udhhav Thackeray)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : लोकसभेचे काही उमेदवार बदलण्याचा भाजपा वरिष्ठांचा शिंदेंना सल्ला)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक, डॉक्टर हेडगेवार, परमपूज्य गुरुजी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, ही ज्यांची श्रद्धास्थाने आहेत शिवाय राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या महान व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात नितांत आदरभाव आहे, मग तो व्यक्ती आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रातील असेना. अशा नितीनजींचे संस्कार दलबदलू आणि समाजाची यत्किंचितही चिंता न करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना काय समजणार ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजयुमो  आणि भाजप हा गडकरींचा कार्यात्मक प्रवास. कार्यक्रमात सतरंजी  टाकण्यापासून तो आंदोलनाचे आयोजन करण्यापर्यंत आणि प्रसंगी व्यासपीठ सांभाळण्यापर्यंत त्यांनी काम केले आहे. आपल्या प्रकृतीची व परिवाराची चिंता न करता सJर्व क्षेत्रांत सर्व धर्मातील लोकांसाठी कार्य करणारा गडकरींसारखा प्रामाणिक राष्ट्रभक्त उद्धव ठाकरे तुम्हाला या जन्मात तरी समजणे कठीण आहे.

नितीनजी सत्तेसाठी आतुरलेले, हपापलेले व्यक्तित्व नाही, तर नियोजनबद्ध आणि शाश्वत सुंदर कार्यासाठी प्रभावीपणाने कार्य करणारे भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत.आजही त्यांचे वागणे, बोलणे, सलगी करणे हे भाजपच्या सर्व नेत्यांसाठी आदर्शवत असल्याने त्यांचा पक्षामध्ये आदरयुक्त दरारा आहे. तो दरारा भयापोटी नाही, तर कार्यामुळे आहे.

समजा पक्षाद्वारे नितीनजींना तिकीट दिले गेले नाही,(अर्थात ते होऊच शकत नाही) तर नितीनजी एक वेळ पक्षादेश म्हणून निवडणुकीच्या रिंगणात येणारच नाहीत; कार्य पक्षाचेच करत रहातील. शिवाय जनतेच्या आग्रहासाठी स्वतंत्र उमेदवार म्हणूनही केवळ नागपूरच नव्हे, तर महाराष्ट्रात कुठेही त्यांनी निवडणूक लढविली, तरी त्यांचा पराभव करण्याचे सामर्थ्य कोणत्याच नेत्यात नाही, हे उद्धव ठाकरेंनी चांगले समजून असावे. उद्धवजी तुम्हाला तुमचा पक्ष बाळासाहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते आणि प्रामाणिक शिवसैनिक सांभाळता आले नाहीत. संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर तुमचे नियंत्रण नाही आणि तुम्ही नितीनजींसारख्या व्यक्तीत्वाला हात घालण्याचा प्रयत्न करत आहात. हे म्हणजे ज्याला संध्येतील तीन पळ्या आचमन करणे जमत नाही, त्याने सागर पिऊन टाकण्याची भाषा बोलण्यासारखे आहे.

उद्धवजी, तुमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे ज्यांचा सावरकरांच्या सामाजिक विज्ञाननिष्ठ कार्याप्रती आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीप्रती आदरभाव होता. तसेच तुमचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचे छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे दैवत होते. त्या सावरकरांचे संडासवीर, माफीवीर, स्व -तंत्रवीर, राष्ट्रद्रोही, ब्रिटिशधार्जिणे अशा शब्दांद्वारे चारित्र्यहनन करणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांबरोबर तुम्ही सलगी करून सावरकरांचा अपमान चुपचाप गिळून मेजवान्या झोडल्यात त्या तुमच्यासारख्यांनी नितीनजींसारख्या सावरकरांप्रती भक्तीभाव असणाऱ्या राष्ट्रभक्तांची चेष्टा करणे शोभणारे नाही. हे कृत्य म्हणजे बाजार बसवणाऱ्याने पातिव्रत्याचे प्रदर्शन करण्यासारखे आहे. अशा बाजारबसविला सतीचे सतीत्व कळणे कठीण.

उद्धवजी, नितीनजी समजावयाचे असेल, तर आजपासूनच संघ स्थानावर जाऊन स्वयंसेवकत्व स्वीकारा आणि पहिले स्वयंसेवक होऊन मग राष्ट्र, समाज, संस्कृती, धर्म आणि राजकारणाला लागा. तुम्हाला सेवा काय असते, हे कळेल नितीनजी, नितीनजी आहेत ! ती एक स्वतंत्र कार्यात्मक संस्था आहे. तो एक दरबार आहे, ते एक स्वतंत्र साम्राज्य आहे, ते अनभिषिक्त सम्राट आहेत, प्रामाणिक निष्ठावान श्रद्धावान कार्याचे ते एक स्वतंत्र व्यासपीठ आहे.ते तुमच्या मस्तिष्कात न समावणारे सामर्थ्यवान पण संयमित वादळ आहे. (Udhhav Thackeray)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.