- ऋजुता लुकतुके
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) नुकतीच काश्मीर राज्यात आपल्या कुटुंबीयांसमवेत भटकंती केली. आणि या दरम्यान श्रीनगरमध्ये तो दिव्यांग क्रिकेटपटू आमीर लोणला भेटला होता. लोणला दोन्ही हात नाहीएत. आणि पायात चेंडू पकडून तो गोलंदाजी करतो. आपला क्रिकेटमधील देव असलेला सचिन तेंडुलकरला भेटून लोणलाही आनंद झाला होता. (Sachin Praises Amir Lone)
या भेटीनंतर काही दिवसांनी सचिनने आता लोणवर एक ट्विटर पोस्ट समर्पित केली आहे. ‘हाच खरा लेगस्पिनर आहे,’ असं गौरवोद्गार सचिनने काढले आहेत. (Sachin Praises Amir Lone)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : लोकसभेचे काही उमेदवार बदलण्याचा भाजपा वरिष्ठांचा शिंदेंना सल्ला)
३४ वर्षीय आमीर हसन लोण (Aamir Hasan Lone) पायांत चेंडू पकडून गोलंदाजी करतो. आणि फलंदाजी करताना तो खांदा आणि मान यांचा आधार घेतो. आपल्या या अनोख्या शैलीने सध्या लोणने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. ‘तुझ्या प्रत्येक चेंडूने तो अडचणी दूर फेकून देतो. तो आपल्या सगळ्यांमध्ये उठून दिसतो. आणि तोच खरा लेगस्पिनर आहे,’ या शब्दांत सचिनने ट्विटरवर आमीरचं कौतुक केलं आहे. (Sachin Praises Amir Lone)
Defying odds with every delivery, Amir stands out as the “REAL LEG SPINNER”!
You’re an inspiration to all. pic.twitter.com/GWEAiV8Tob
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 7, 2024
लोणच्या एका शालेय शिक्षकांनी त्याच्यातील क्रिकेट कौशल्य हेरलं. आणि त्याला दिव्यांगांच्या क्रिकेटसाठी तयार केलं. त्यानंतर २०१३ पासून तो व्यावसायिक क्रिकेटमध्ये सहभागी होत आहे. आमीर ८ वर्षांचा असताना वडिलांच्या गिरणीत एका अपघातात त्याला दोन्ही हात गमावावे लागले. पण, जिद्द न हरता आपली बरीच कामं तो हातांशिवाय करायला शिकला. आणि क्रिकेटही त्याने तसंच आत्मसात केलं. (Sachin Praises Amir Lone)
(हेही वाचा- Article 370 : ‘आर्टिकल 370’ चित्रपट छत्तीसगडमध्ये टॅक्सफ्री)
सचिनने खूप पूर्वी आमीरची कहाणी ऐकून आणि त्याची सचिनला भेटण्याची इच्छा ऐकून त्याला भेटण्याचं वचन दिलं होतं. फेब्रुवारी महिन्यात सचिनने जम्मू आणि काश्मीरची सहल केली, तेव्हा त्याने हे वचन पाळलं. (Sachin Praises Amir Lone)