Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिक पूर्वी नीरज चोप्राने केली ‘ही’ मोठी घोषणा 

Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकची तयारी सुरू करण्यापूर्वी नीरज चोप्रा भलताच आत्मविश्वासपूर्ण दिसत आहे

186
Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्रा भारतातील स्पर्धेत खेळणार 
Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्रा भारतातील स्पर्धेत खेळणार 
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिक आणि जागतिक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) पुढील आठवड्यापासून तुर्कीए इथं पॅरिस ऑलिम्पिकची (Olympics) तयारी सुरू करत आहे. तिथे जाण्यापूर्वी तो नवी दिल्लीत एक स्पर्धाही खेळणार आहे. २०२४ मधील त्याची ही पहिलीच स्पर्धा असेल. आणि स्पर्धेपूर्वी नीरजने आत्मविश्वासपूर्ण विधान केलं आहे. ‘इतका तंदुरुस्त पूर्वी कधीच नव्हतो. आणि स्पर्धेसाठी इतका तयारही नव्हतो,’ या शब्दात त्याने आपली शारीरिक आणि मानसिक तयारी दाखवून दिली आहे. (Neeraj Chopra)

(हेही वाचा- Udhhav Thackeray : उद्धवजी ! या जन्मात तुम्हाला नितीनजी कळणे कठीण !)

नुकतंच दक्षिण आफ्रिकेतील सराव शिबिर संपवून नीरज भारतात परतला आहे. आणि काही दिवसांतच तो तुर्किएला जाणार आहे. ‘आतापर्यंतचा सराव खूपच चांगला झाला आहे. तंत्र आणि क्षमता यांच्या इतकंच महत्त्व मी तंदुरुस्तीला देतो. आणि म्हणूनच माझ्यामते मी इतका तयार कधीच नव्हतो,’ असं नीरज साई मीडियाशी बोलताना म्हणाला. (Neeraj Chopra)

सराव आणि स्पर्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी होणं हे जास्त महत्त्वाचं आहे, याचं भानही नीरजला आहे. (Neeraj Chopra)

पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) तयारीविषयी नीरजने पत्रकारांशी मोकळेपणाने चर्चा केली. ‘टोकयो आणि पॅरिसमध्ये परिस्थितीत खूप बदल असणार आहे. पण, टोकयोनंतरही मी दोन जागतिक विजेतेपदं मिळवली आहेत. आणि म्हणून मला वाटतं माझा प्रवास योग्य दिशेनं सुरू आहे. माझी तयारी चांगली होतेय,’ असं नीरजने बोलून दाखवलं. (Neeraj Chopra)

(हेही वाचा- Sachin Praises Amir Lone : ‘हाच खरा लेगस्पिनर आहे,’ असं सचिन कुणाबद्दल म्हणाला?)

टोकयो ऑलिम्पिकनंतर नीरजने ९० मीटरच्या भालाफेकीचं लक्ष्य ठेवलं होतं. ते अजून सर व्हायचं आहे. पण, सध्या महत्त्वाच्या स्पर्धेत किती अंतर कापलं यापेक्षा पदक विजेत्या कामगिरीवर तो लक्ष केंद्रीत करणार आहे. जर्मनीचा युवा भालाफेकपटू मॅक्स डेनिंगने काही महिन्यांपूर्वी हिवाळी स्पर्धांमध्ये ९०.२ मीटरचं अंतर पार केलं आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पर्धा तगडी असणार याची कल्पना नीरजला आली आहे. तो आता त्यासाठीच सराव करणार आहे. (Neeraj Chopra)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.