IPL 2024 : सनरायजर्स हैद्राबादची नवीन जर्सी कशी आहे?

IPL 2024 : या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबाद संघाची जर्सी नक्कीच लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे 

178
IPL 2024 : सनरायजर्स हैद्राबादची नवीन जर्सी कशी आहे?
IPL 2024 : सनरायजर्स हैद्राबादची नवीन जर्सी कशी आहे?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमधील सनरायजर्स हैद्राबाद (sunrisers hyderabad) संघाने नवीन हंगामासाठी संघाची नवीन जर्सी लोकांसमोर आणली आहे. शुक्रवारी तांबड्या रंगावर काळा पॅटर्न असलेल्या या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. भडक पण, त्याचवेळी जिवंतपणा आणि शौर्य दाखवणारी ही जर्सी आहे, असं सनरायजर्स संघाने म्हटलं आहे. (IPL 2024)

(हेही वाचा- Virat Kohli On IPL : विराट कोहलीने सांगितलं, आयपीएलच्या लोकप्रियतेचं रहस्य )

सनरायजर्स फ्रँचाईजीने संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही जर्सी प्रसिद्ध केली आहे. आणि संघाचा मुख्य तेज गोलंदाज भुवनेश्वर कुमार ही जर्सी घालून दिसत आहे. ‘स्फोटक किट, आग ओकणारा खेळाडू, सगळेच कडव्या आयपीएल २०२४ साठी तयार आहेत,’ असा या ट्टिवचा मथळा आहे. (IPL 2024)

यंदा काव्या मारन यांच्याकडे मालकी असलेल्या या फ्रँचाईजीने संघ प्रशासनात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज डॅनिएल व्हिटोरी संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. इतकंच नाही तर संघाचं नेतृत्वही यंदा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आलं आहे. २०१६ मध्ये फ्रँचाईजीने आपलं शेवटचं आयपीएल विजेतेपद पटकावलं होतं. आता नवीन हंगामाच्या सुरुवातीपूर्वी संघात अनेक बदल करण्यात येत आहेत. (IPL 2024)

(हेही वाचा- Udhhav Thackeray : उद्धवजी ! या जन्मात तुम्हाला नितीनजी कळणे कठीण !)

२०१८ मध्येही हा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. आता २०२४ पूर्वी हैद्राबाद संघाने हॅरी ब्रूक, कार्तिक त्यागी, आदिल रशिद, अकील हुसेन आणि समर्थ व्यास या खेळाडूंना संघातून काढून टाकलं. आणि त्यांच्या जागी पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड, जयदेव उनाडकट, वालिंदू हसरगा आणि आकाश सिंग यांना संघात घेतलं आहे. या खेळाडूंसाठी लिलावात त्यांनी जवळ जवळ ३१ कोटी रुपये मोजले आहेत. (IPL 2024)

थोडक्यात, नवीन जर्सी, नवीन कर्णधार आणि नवीन खेळाडूंसह सनरायजर्स हैद्राबद संघ आयपीएलच्या हंगामासाठी तयार झाला आहे. (IPL 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.