Madhya Pradesh : मध्यप्रदेशमध्ये मंत्रालयाच्या इमारतीला आग

Madhya Pradesh : महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे कर्मचाऱ्यांना सुटी होती. त्यामुळे या अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झालेली नाही.

178
Madhya Pradesh : मध्यप्रदेशमध्ये मंत्रालयाच्या इमारतीला आग
Madhya Pradesh : मध्यप्रदेशमध्ये मंत्रालयाच्या इमारतीला आग

मध्यप्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी असलेल्या भोपाळमध्ये वल्लभ भवन (Vallabh Bhavan) राज्य सचिवालयाला शनिवारी सकाळी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. मंत्रालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे कर्मचाऱ्यांना सुटी होती. त्यामुळे या अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झालेली नाही.

(हेही वाचा – Maldives : मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मागितली माफी; म्हणाले मी पंतप्रधान मोदींचा समर्थक)

भोपाळच्या (Bhopal) सचिवालयात आज, शनिवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. सचिवालयाच्या इमारतीतून काळ्या धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. आग भीषण असल्याचा अंदाज घटनास्थळावरील व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या धुरावरून लावता येतो. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. भोपाळमधील अरेरा हिल्सवर असलेल्या वल्लभ भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. इमारतीच्या खिडकीतून धूर निघत असल्याचे लोकांनी पाहिल्यानंतर एकच गोंधळ उडाला.

सरकारी कागदपत्रे जळून खाक होण्याची शक्यता

तातडीने ही माहिती महापालिकेच्या अग्निशमन नियंत्रण कक्षाला देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. इमारतीच्या गेट क्रमांक 5 आणि 6 मधील मोठ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली, ती पाचव्या मजल्यापर्यंत पसरली. आग वाऱ्यासह वेगाने पसरली. अग्निशमन दलाचे पाच जवान अडकल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीतून उठणाऱ्या ज्वाळा आणि धूर दुरूनच दिसत आहेत. या आगीत अनेक महत्त्वाची सरकारी कागदपत्रे जळून खाक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी या आगीच्या घटनेवर चिंता व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने मंत्रालयात कर्मचारी नव्हते. सध्या वल्लभ भवन प्रशासनाने नुकसानीची कोणतीही माहिती दिलेली नाही. (Madhya Pradesh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.