Prakash Ambedkar : काँग्रेसमध्ये सुपारी बाज,काँग्रेसवाले भुरटे चोर – प्रकाश आंबेडकर

300
Ambedkar बदला घेणार की Gandhi यांच्या पायाशी जाणार?
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले यातच युती आणि आघाड्यांचे राजकारण देखील रंगू लागले जागा वाटपावरून वेगवेगळे तर्कवितर्क देखील लावले जात अशातच महाविकास आघाडी बरोबर आघाडी करण्याचा विचार करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेस बाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.कांग्रेसमध्ये सुपारीबाज कोण आहेत त्यांची नावे तीन दिवसांनी जाहीर करणार , मल्लिकार्जून खर्गे यांनी या नेत्यांना पक्षातून काढावं. अशी मागणीच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाकडे केली आहे. (Prakash Ambedkar)
ईव्हीएम बद्दल देखील साशकंता…
ईव्हिएममध्ये घोटाळा आहे, इव्हिएम टेंपर्ड होऊ शकतो. नेमकं मत कुणाला गेलंय हे कळायला पाहीजे.मतांची टॅली व्हायला हवी. यासाठी राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक आयोगाकडे सर्वपक्षीय मागणी केली पाहिजे असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केली आहे. (Prakash Ambedkar)
बैठक आहे किंवा रद्द झाली हे देखील आम्हाला कळवले जात नाही…
अद्यापही महाविकास आघाडीचा जागेचा तीढा सुटलेला नाहीये.१५ जागांवर मतभेद आहेत, आज बैठक होती , ही रद्द झाली हे देखील त्यांनी आम्हाला सांगितलं नाहीये. त्यामुळे जेव्हा ते बोलवताल तेव्हा आम्ही जाऊ.आमची भूमिका त्यानंतर मांडू अशी स्पष्ट भूमिका वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.मतांचं ध्रूविकरण झालंय, मनोज जरांगेमुळे मतं विभागली जाणार आहेत. याचे आगामी निवडणूकीत पडसाद ऊमटणार आहेत. (Prakash Ambedkar)
एकनाथ शिंदे यांचे भवितव्य भाजपच्या हातात…
एकनाथ शिंदे हे स्वतासोबत आमदार खासदार घेऊन आले आहेत.त्यांना शाबूत ठेवण्यात भाजप त्यांना कीती मदत करेल हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेले आमदार खासदार यांचे भवितव्य भाजपच्या हातात असल्याचा सूर देखील त्यांनी आळवला. (Prakash Ambedkar)
ऊद्धव ठाकरेंना सल्ला 
राजकीय खेळी भाग म्हणून “सुबह का भूल शाम को घर आये तो ऊसे भूला नही कहते” असं म्हणतात. या ऊक्तीवर का होईना राजकारण व्हायला हवं आणि उद्धव ठाकरेंनी याचा पुढे जाऊन विचार केला पाहिजे असा सल्लादेखील आंबेडकर यांनी दिला. (Prakash Ambedkar)
शेवटी जाता जाता आमच्यावर कुणी कीतीही रंग टाकू द्यात, पण आम्ही तोच रंग घेऊ जो आम्हाला हवाय. कुणाचाही रंग आम्ही घेणार नाही असा टोला त्यांनी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना देखील बोलून दाखवला आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे पूर्ण भवितव्य काय राहणार आहे हे येणाऱ्या पुढील काळातच काही दिवसात कळून येईल. (Prakash Ambedkar)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.