महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या मुद्यावरून भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेला गुंता जवळपास सुटला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी काल शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत जागा वाटपाच्या मुद्यावर तोडगा निघाला आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह राज्यांतील तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते. ही बैठक रात्री सव्वा दहाच्या सुमारास सुरू झाली होती आणि साडेबारापर्यंत चालली. (Lok Sabha Election 2024)
सेना-राकॉंकडून जादा जागांची मागणी
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यातील पंधरा-सोळा जागांवर शिवसेनेने आपला दावा केला आहे. कारण, एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदारांसह बरेच ज्येष्ठ नेते रालोआत आले होते. या सर्वांना निवडणुकीच्या मैदानात उतरवायचे आहे. याशिवाय, राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुध्दा नऊ जागांची मागणी केली असल्याचे समजते. (Lok Sabha Election 2024)
भाजपाचा फोकस चारशे जागांवर
भाजपाला लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नाही आहे. यावेळी चारशे जागांचे लक्ष्य गाठायचे आहे. यामुळे एक-एक जागेचा निर्णय अत्यंत विचार करून घेतला जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही जागा संकटात असल्याची बाब अंतर्गत सर्वेक्षणात दिसून आली आहे. (Lok Sabha Election 2024)
अमित शहा यांच्यासोबत काल रात्री झालेल्या बैठकीत या सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली असून तिन्ही पक्षांतील जागा वाटपाचा तिढा आता जवळपास सुटला आहे. याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – IPO Boom : आयपीओमधील गुंतवणुकीतून या स्टारनी मिळवले करोडो रुपये )
भाजपाकडून मित्रपक्षांना तीन प्रस्ताव
भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने शिवसेना आणि राकॉंपुढे दोन प्रस्ताव दिले असल्याचे समजते. जेणेकरून ४८ पैकी किमान ४५ जागांवर रालोआचे उमेदवार विजयी होतील. पहिल्या प्रस्तावानुसार, भाजपा ३४, शिवसेना १० आणि राकॉं चार जागा लढवू शकते. हा प्रस्ताव मान्य झाला तर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाकडून भरपाई केली जाणार आहे. (Lok Sabha Election 2024)
दुसऱ्या प्रस्तावानुसार, ३० जागा भाजपा लढविणार. शिवसेना १२ आणि राकॉं सहा जागा लढविणार. परंतु, शिवसेना आणि राकॉंचे दोन-तीन उमेदवार त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर नव्हे तर भाजपाच्या तिकीटवर निवडणूक लढतील. यात जागांची अदलाबदल सुध्दा होण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election 2024)
याशिवाय आणखी एका तिसऱ्या प्रस्तावाची सुध्दा चर्चा आहे. यानुसार शिवसेना १३ जागा लढविणार आणि राकॉं पाच जागा लढविणार. उर्वरित ३० जागा भाजपाकडून लढविल्या जातील. मात्र यातही दोन्ही पक्षांचे उमेदवार भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community