IND vs ENG : इंग्लंडच्या बॅझबॉलला धूळ चारत भारताचा मोठा विजय; ४ -१ ने मालिका खिशात

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करत २५९ धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ १९५ धावांवर गारद झाला.

231
IND vs ENG : इंग्लंडच्या बॅझबॉलला धूळ चारत भारताचा मोठा विजय; ४ -१ ने मालिका खिशात

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये धरमशाला येथे रंगलेली पाचवी कसोटी भारताने सहज आपल्या नावावर करून घेत ४ – १ च्या फरकाने ही मालिकाही जिंकली आहे. धरमशाला येथे रंगलेल्या अंतिम कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे रविचंद्रन अश्विनने धर्मशाला येथे आपली १०० वी कसोटी खेळली. त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ बळी घेतले.

(हेही वाचा – IPL 2024 : सनरायजर्स हैद्राबादची नवीन जर्सी कशी आहे?)

यापूर्वी भारताने २०१२ – १३ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतात कसोटी मालिका (IND vs ENG) गमावली होती.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका

पहिली कसोटी (हैदराबाद)-इंग्लंड २८ धावांनी विजयी

दुसरी कसोटी (विशाखापट्टणम) भारताने हा सामना १०६ धावांनी जिंकला.

तिसरी कसोटी (राजकोट) भारताने हा सामना ४३४ धावांनी जिंकला.

चौथी कसोटी (रांची) भारताचा ५ गडी राखून विजय

पाचवी कसोटी (धर्मशाला) भारताने एक डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला

(हेही वाचा – WPL 2024 : दीप्ती शर्माच्या हॅट-ट्रीकसह अष्टपैलू खेळामुळे युपी वॉरियर्सची दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेनं मात)

इंग्लंडने (IND vs ENG) प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करत २५९ धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ १९५ धावांवर गारद झाला. १००वी कसोटी खेळणाऱ्या अश्विने सर्वाधिक ९ विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.

आर अश्विनने ५, जसप्रीत बुमराह २, कुलदीप यादव २ आणि रवींद्र जडेजा याने १ विकेट घेतली. (IND vs ENG)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.