मनसेने जी आंदोलने केली त्याचा शेवट झाला, फोनवर मराठी ऐकायला यायला लागले, ६५ टोलनाके बंद झाले. मराठी पाट्या झाल्या. अनेक प्रार्थना स्थळावरील भोंगे बंद झाले. उद्धव ठाकरे सरकारने माझ्या १७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केले. हे स्वत:ला हिंदुत्ववादी समजतात. या मुलांनी काय चुकीचे केले होते? ज्या भोंग्याचा मुस्लीम समाजालाही त्रास होतो, अनेक मुस्लीम बांधवांनी मला सांगितले की. लहान मुले आहेत त्यांना भोंग्याचा त्रास होत होता. सरकार ढिले पडल्यानंतर पुन्हा ते सुरू झाले. हे राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एकसाथच बंद करून टाकतो, असे आवाहन राज मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जनतेला केले.
…मग अजून शिवस्मारक का झाले नाही?
राज ठाकरे यांच्या नेतृ्त्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार, ९ मार्च रोजी नाशिक शहरात पार पडला. या सोहळ्यात बोलताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीसह विरोधकांच्या महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. मनसेकडून आंदोलने अर्धवट सोडली जातात, अशी टीका केली जाते, मी विचारतो, अरबी समुद्रात आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अजून का झाले नाही? असा रोखठोक सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. मनसेने अनेक कामे केली, आंदोलने केली, यशस्वी आंदोलन केली. अनेकांनी तुरुंगवास भोगला. लाठ्याकाठ्या खाल्ल्या ते महाराष्ट्रासाठी…मग आपले विरोधक काही गोष्टी पसरवतात. एक आंदोलन दाखवायचे ज्याचा आम्ही शेवट केला नाही. बाकीच्यांना प्रश्न विचारले जात नाहीत, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
(हेही वाचा Hindus In Bangladesh : बांगलादेशातील मुसलमानांच्या छळाला कंटाळून १०० हिंदूंनी घेतला भारतात आश्रय)
राष्ट्रवादी आजही एकच
मनसेने मशिदीवरील भोंगे उतरवले, त्यानंतर भोंगा लावण्याची कुणाची हिंमत आहे बघू…समुद्रावरती अनधिकृत मशिद बांधली जात होती एका रात्रीत पाडायला लावली. आम्ही प्रार्थना, नमाज करू नका म्हणतोय का? बाकीचे लोक आपल्याबद्दल जो अप्रचार करतायेत त्याबद्दल त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे. पहिल्यापासून आपली भूमिका स्वच्छ आणि प्रामाणिक होती आणि आहे. रस्ते नीट नाहीत आणि टोल वसूल केले जातात, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला आहे. मला अनेक माताभगिनी भेटतात आणि आता फक्त विश्वास तुझ्यावर आहे असे सांगतात. हा आज लोकांचा विश्वास टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. बाकींच्या लोकांचा विश्वास गमावला आहे. राष्ट्रवादी आजही एकच आहेत असे माझे ठाम मत आहे, असा दावाही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला.
Join Our WhatsApp Community