Dargah : पुण्यातील ‘त्या’ दर्ग्याचे बांधकाम अनधिकृतच; दर्ग्याच्या ट्रस्टींची कबुली; स्वतः बांधकाम तोडणार

पुण्येश्वर मंदिर आणि येथे दर्गा आहे आणि तो अनधिकृत असल्याचा दावा यापूर्वी करत भाजपचे आमदार नितेश राणे, स्थानिक नगरसेवक मोहोळ आणि काही नगरसेवकांच्या उपस्थितीत मोठा मेळावा झाला होता.

752

पुण्यातील कसबा पेठेतील पुण्येश्वर जवळील दर्ग्याचे (Dargah) अनधिकृत बांधकाम पुणे महानगर पालिकेकडून तोडण्यात येणार, अशी अफवा पसरल्यामुळे शनिवारी रात्रीच या ठिकाणी हजारो मुसलमान एकत्र आले होते, त्यामुळे येथील वातावरण तणावाचे बनले होते. त्यानंतर महापालिका प्रशासन, शेख सल्लाउद्दीन दर्गा ट्रस्ट आणि पोलीस प्रशासन यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी दर्गा ट्रस्टने दर्ग्या जवळचे बांधकाम अनधिकृत आहे, अशी कबुली देत आम्ही स्वतः अनधिकृत बांधकाम तोडणार आहोत, असे म्हटले.

अफवा न पसरवण्याचे पोलिसांचे आवाहन  

त्याआधी महापालिकेचे अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, आमच्याकडून दर्ग्यावर (Dargah) कोणतीही कारवाई होणार नव्हती आणि अशा कारवाईचे नियोजन देखील नाही. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही याबाबत अफवा पसरवू नये. अफवा पसरविणारे आमच्या रडारवर आहेत. त्यांनी तातडीने दखल घ्यावी अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. पुण्येश्वर मंदिर आणि येथे दर्गा आहे आणि तो अनधिकृत असल्याचा दावा यापूर्वी करत भाजपचे आमदार नितेश राणे, स्थानिक नगरसेवक मोहोळ आणि काही नगरसेवकांच्या उपस्थितीत मोठा मेळावा झाला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल झाला होता.

(हेही वाचा Raj Thackeray : राज्य माझ्या हातात द्या, एकसाथ सगळे भोंगे बंद करून टाकतो; राज ठाकरे यांचे आवाहन)

दर्ग्याचे ट्रस्टी स्वतः बांधकाम तोडणार 

शुक्रवारी या दर्ग्यावर (Dargah) कारवाई होणार म्हणून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत दर्ग्याच्या ट्रस्टींनी बैठक झाली. त्यावेळी या दर्ग्याचे बांधकाम अनधिकृत असल्याची कबुली ट्रस्टने दिली. आता या दर्ग्याच्या ट्रस्टकडून स्वत: अतिक्रम हटवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.