- ऋजुता लुकतुके
शनिवारी सोन्याच्या किमती भारतीय कमोडिटी बाजारांत ६५,२९८ रुपये प्रती १० ग्रॅम इतक्या वर चढल्या. हा नवीन उच्चांक आहे. मागच्या फक्त सात दिवसांचा आढावा घेतला तर किमतींत एका आठवड्यात २,७०० रुपयांची वाढ झाली आहे. अमेरिकन फेडरल बँक जून महिन्यात तिथले रेपो दर कमी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बातमी बाँड मार्केट आणि सोन्याच्या वायदे बाजारासाठी सकारात्मक अशीच आहे. आणि त्याचाच परिणाम भारतातही सोन्याच्या बाजारात दिसून येत आहे. (Why is Gold Rising?)
या बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने २,१५२ अमेरिकन डॉलर प्रती आऊंसचा उच्चांक केला. फेब्रुवारी महिन्यात जगभरात शेअर बाजार चढत असताना सोनं काहीसं मागे पडलं होतं. सोन्याच्या दरात या महिन्यात उलट घट पहायला मिळाली. भारतातही या कालावधीत सोन्याच्या किमतीत ०.६७ टक्क्यांची घट झाली. (Why is Gold Rising?)
सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीसाठी दोन कारणं देण्यात येत आहेत. एक म्हणजे फेडरल बँक चेअर जेरोम पॉवेल यांनी येत्या काही महिन्यात अमेरिकेत रेपो दरात कपात करण्याचे दिलेले संकेत. आणि जगभरात डॉलर इंडेक्समध्ये झालेली घट. जगातील आघाडीच्या सहा चलनांच्या बास्केटची तुलना अमेरिकन डॉलरशी करून हा इंडेक्स काढला जातो. आणि मार्चमध्ये डॉलर इंडेक्स १०३.८ इतका होता. मागच्या सहा दिवसांत डॉलर इंडेक्समध्ये ०.१७ टक्क्यांची घट झाली आहे. (Why is Gold Rising?)
(हेही वाचा – पंतप्रधान मोदींचा अपमान; Maldives च्या अर्थव्यवस्थेला फटका; भारतीय पर्यटकांच्या संख्येत 33% घट)
सोन्याचे दर मार्चमध्ये कसे असतील?
आता प्रश्न उपस्थित होतो की, नवीन उच्चांकानंतर सोन्याचे दर मार्चमध्ये नेमके कुठल्या दिशेनं जातील. भविष्यात हे दर किती असतील? (Why is Gold Rising?)
वाढत्या महागाईविरोधात हेजिंग म्हणून मध्यवर्ती बँकाही आपल्याकडे सोन्याचा साठा करून ठेवत असतात. आणि जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, सगळ्याच मध्यवर्ती बँकांनी आपल्याकडचा सोन्याचा साठा २०२३ पासून कमी केला आहे. १,०३७ टन इतकंच सोनं मध्यवर्ती बँकांकडे आहे. उर्वरित सोनं त्यांनी बाजारात आणलं आहे. आणि हा ट्रेंड असाच राहील असा अंदाज आहे. म्हणजे सोनं बाजारात उपलब्ध असेल. पण, सोन्याचे दर ठरवण्याचं काम भू-राजकीय संकटं आणि देशांतर्गत अर्थव्यवस्था करतील, असं तज्ज्ञांना वाटतं. (Why is Gold Rising?)
‘सोन्यात येणाऱ्या दिवसांच चढ उतार असतील अशीच शक्यता आहे. देशातील महागाई, बँकांकडील सोन्याचा साठा या गोष्टी देशांतर्गत पातळीवर महत्त्वाची ठरतील. तसंच जागतिक स्तरावर युद्ध आणि अस्थिरतेसारखी भू-राजकीय कारणंही सोन्याची किंमत ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असं क्वांटम एएमसीचे चिराग मेहता यांनी सांगितलं. अमेरिकेतील फेडरल बँकेचा दर कपातीचा निर्णय येत्या काही महिन्यात सोन्याच्या किमतींवर मोठा प्रभाव टाकेल हे उघड आहे. (Why is Gold Rising?)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community