Football News : बार्सिलोनाचा युवा लेमिन यामल करतोय फुटबॉल मैदानात कमाल

बार्सिलोनाने मलोर्काचा १-० ने पराभव केला.

175
Football News : बार्सिलोनाचा युवा लेमिन यामल करतोय फुटबॉल मैदानात कमाल
Football News : बार्सिलोनाचा युवा लेमिन यामल करतोय फुटबॉल मैदानात कमाल
  • ऋजुता लुकतुके

स्पेनच्या ला लिगा स्पर्धेत शनिवारचा दिवस लक्षवेधी ठरला तो बार्सिलोना या प्रतिष्ठित क्लबचा युवा स्ट्रायकर लेमिन यामलमुळे. बार्सिलोना विरुद्ध मोलार्का सामन्यात त्याने एक अप्रीतम गोल करत बार्सिलोनाला हा सामना १-० असा जिंकून दिला. (Football News)

७३ व्या मिनिटाला यामलने मैदानाच्या टोकावर असताना गोलजाळ्याच्या डाव्या कोपऱ्यात अगदी उंचावर चेंडू मजबूत फटकावला. आणि तो बरोबर दिशेनं गेलाही. घरच्याच मैदानावर हा सामना झाल्यामुळे मग प्रेक्षकांनी यामलच्या नावाचा जल्लोष केला. लेमिन फक्त १६ वर्षांचा आहे. आणि या हंगामात त्याने आपल्या खेळाने कमाल केली आहे. (Football News)

(हेही वाचा – PM Narendra Modi : सीमावर्ती गावांच्या विकासाकडे यापूर्वी दुर्लक्ष)

हा विजय बार्का संघासाठी मोलाचा होता. कारण, लीगमध्ये आघाडीवर असलेल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी रियाल माद्रिद संघाची आघाडी आता त्यांनी कमी करून फक्त ५ गुणांवर आणली आहे. बार्सिलोनाने या सामन्यात वारंवार आक्रमणाचा प्रयत्न केला. आणि प्रतिस्पर्धी मोलार्का संघाला त्यांनी जेरीलाही आणलं होतं. इतकंच नाही तर सामन्याच्या सुरुवातीला गंडोवनकडे पेनल्टीवर गोल करण्याची संधीही चालून आली होती. पण, हा फटका मोलार्काच्या गोलीने बरोबर अडवला. (Football News)

पण, अखेर सामन्याचा स्टार ठरला तो लेमिन यामल. १३ जुलै २००७ चा जन्म असलेला यामल स्पेनचा उगवता फुटबॉल तारा मानला जातो. २०२२-२३ हंगामात बार्सिलोना क्लबने त्याचं कौशल्य हेरून त्याला करारबद्ध केलं. आणि यावर्षी त्याचा करार वाढवला आहे. डाव्या बगलेतून आक्रमण करण्याची भूमिका तो संघासाठी बजावतो. (Football News)

स्पेनकडून १४ आणि १५ वर्षांखालील गटात तो आंतरराष्ट्रीय सामनेही खेळला आहे. डावखुरा असलेला यामल चेंडू दोन पायांत खेळवत राहणं, वेळेवर चेंडू पास करणं आणि गोलच्या संधी निर्माण करणं यात निष्णात असल्याचं मानलं जातं. (Football News)

स्पेनमध्ये त्याची तुलना गावीशी केली जाते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.