आगामी लोकसभा निवडणुकीची आता कधीही घोषणा होऊ शकते, अशी परिस्थिती असताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त (Election Commissioner) अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदाचा राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगात आधीच निवडणूक आयुक्ताचे एक पद रिक्त होते. त्यात आता अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने निवडणूक आयोगात महत्त्वाच्या पदावर केवळ मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हेच उरले आहेत.
(हेही वाचा पंतप्रधान मोदींचा अपमान; Maldives च्या अर्थव्यवस्थेला फटका; भारतीय पर्यटकांच्या संख्येत 33% घट)
उरले फक्त मुख्य निवडणूक आयुक्त
केंद्रीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत (Election Commissioner) दोन निवडणूक आयुक्त हे देखील प्रमुख पदे असतात. दोन्ही निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिल्याने आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी असणार आहे. निवडणूक आयोगाकडून सध्या देशातील वेगवेगळ्या राज्यांचा दौरा सुरु आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (Election Commissioner) राजीव कुमार यांच्यासोबत अरुण गोयल हे देखील विविध राज्यांचा दौरा केला आहे. या दौऱ्यांमधून निवडणुकीची तयारी केली जात आहे. तसेच प्रशासनाकडून काय तयारी करण्यात येत आहे याचा आढावा घेतला जात आहे. असे असताना अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिला आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने आपल्या एका अधिसूचनेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
Join Our WhatsApp Community