लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी गेले काही दिवस दिल्लीत मॅरेथॉन बैठका चालू आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मागणीप्रमाणे जागावाटप होणार का, याच्या चर्चा चालू आहेत. अशात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Lok Sabha Elections 2024)
महायुतीची दिल्लीमधील बैठक सकारात्मक झालेली आहे. एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील, अशी परिस्थिती नाही. ८० टक्के काम पूर्ण झाले असून, २० टक्के काम राहिले आहे. लवकरच हे काम पूर्ण करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा – Mangesh Padgaonkar : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, हा प्रेमाचा संदेश देणारे मंगेश पाडगावकर)
त्यांच्या व आमच्या भूमिकेत फार अंतर नाही
राज ठाकरेंची मनसे (MNS) येत्या निवडणुकीत भाजपशी युती करू शकते, असे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या वर्धापनदिन सोहळ्यात केलेल्या भाषणात कुणासोबतही युती करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी वेगळे संकेत दिले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मनसेने घेतलेली व्यापक भूमिका आमच्याशी विसंगत नाही. त्यामुळे क्षेत्रीय अस्मिता आम्हाला मान्य आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचे मुद्दे मांडले पाहिजे. सोबतच व्यापक भूमिका असावी, असे आमचे मत होते. आज हिंदुत्वाची भूमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या व आमच्या भूमिकेत फार काही अंतर राहिलेले नाही. बाकी निवडणुकीत काय करायचे या गोष्टी तपशील व चर्चेच्या असतात. त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय होऊ शकतात.” (Lok Sabha Elections 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community