निःस्वार्थ व समर्पित भावनेने गोरगरीब रुग्णांची सेवा करताना सामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे कार्य डॅा. चंद्रशेखर मेश्राम, डॅा. संजीव चौधरी तसेच समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी केले आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देताना हे कार्य यापुढेही कायम सुरू राहील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री (Nitin Gadkari) नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागपुरातील वनामती येथील सभागृहात विदर्भातील पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना गडकरी बोलत होते.
(हेही वाचा – Manipur : मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त)
अनेक मान्यवरांची उपस्थिती :
प्राईड आफ इंडिया या सन्मानाबद्दल डॅा. संजीव चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे होत्या. यावेळी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे , माजी महापौर मायाताई इनवाते, माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी, माजी आमदार पारवे, विलास राऊळकर, अरुण पवार, आर.डी.आत्राम, उपायुक्त दशरथ कुळमेथे, डॅा. पुरुषोत्तम मडावी, नयन कांबळे, विदर्भ प्रदेश प्रमुख दीपक मडावी उपस्थित होते. (Nitin Gadkari)
काय म्हणाले नितीन गडकरी ?
निःस्वार्थ व समर्पित भावनेने काम करतानाच व्यावसायिकतेला प्राधान्य न दिल्यामुळे समाजातील गोगरिब रुग्णांची अविरतपणे सेवा करताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राज्याचा व देशाचा गौरव वाढविल्याबद्दल डॅा. चंद्रशेखर मेश्राम व डॅा. संजीव चौधरी यांचा विशेष गौरव करताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, समाजासाठी आदर्श असलेल्या व्यक्तींच्या कार्याची दखल समाजाने घ्यावी त्यांचा सेवाप्रकल्प अविरत सुरू राहावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
(हेही वाचा – UK On Khalistan : ब्रिटन सरकारची खलिस्तान्यांवर मोठी कारवाई, 300 बँक खाती आणि 100 कोटी रुपये जप्त)
📍𝓝𝓪𝓰𝓹𝓾𝓻 | Addressing felicitation program organised by Vidarbha Doctors Tribal Association
https://t.co/EH04p1WpRv— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) March 9, 2024
नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते पद्यश्री पुरस्काराबद्दल डॅा. चंद्रेशखर मेश्राम तसेच प्राईड आफ इंडिया या सन्मानाबद्दल डॅा. सजीव चौधरी यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
आदिवासी गावांमध्ये सुमारे आठ हजार ७९२ महिलांची तपासणी :
ग्रामीण भागातील लोकांमध्ये हाडांचे आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या आजाराबद्दल महिलांमध्ये जागृती नसल्यामुळे महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यावर असलेल्या औषधांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्यामुळे अशा महिलांवर उपचार व संशोधन करण्यात येत असल्याची माहिती डॅा. संजीव चौधरी यांनी दिली. नागपूर (Nitin Gadkari) विभागातील गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये सुमारे आठ हजार ७९२ महिलांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासात आढळून आलेल्या निरीक्षणानुसार आजारांची विभागणी करण्यात आली आहे. यासंबंधीचा संपूर्ण अहवाल तयार करण्यात आला असून तो राष्ट्रपतींना पाठविण्यात येणार आहे. यासंदर्भात येत्या जानेवारीत नागपूर येथे पहिली जागतिक आदिवासी आरोग्य परिषद आयोजित करणारअसल्याची माहिती डॅा. संजीव चौधरी यांनी दिली.
(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : जागावाटपाचे ८० टक्के काम पूर्ण; दिल्लीतील बैठक सकारात्मक झाल्याची देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती)
मेंदूच्या आजारांच्या संदर्भातील शोध घेण्यात येणार :
मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्रामांनी मेंदूंचे आरोग्य कसे जपावे यासाठी मोठ्या प्रमाणात जागरुकता करणे आवश्यक आहे. यासंदर्भात एक लाख लोकांची तपासणी व संशोधन करण्यात येणार असून यामधून मेंदूच्या आजारांच्या संदर्भातील शोध घेण्यात येणार आहे. मेंदूंचे आजार प्रामुख्याने धूम्रपान, तंबाखू व मद्यसेवनाने होत असल्याचे निरीक्षण असून यावर बंदी घातल्यास हा आजार निश्चितच कमी होऊ शकेल, असा विश्वास डॉ. मेश्राम यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. (Nitin Gadkari)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community