Income Tax Department कडून आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर ‘ई-मोहिम’ सुरु

महत्त्वपूर्ण व्यवहारांचे तपशील पाहण्यासाठी, व्यक्ती/संस्था त्यांच्या ई-फायलिंग खात्यावर लॉग इन करू शकतात (आधीच तयार असल्यास) आणि अनुपालन पोर्टलवर याची पूर्तता करू शकतात. या पोर्टलवर महत्त्वपूर्ण व्यवहार पाहण्यासाठी ई-कॅम्पेन टॅबद्वारे प्रवेश करता येऊ शकतो.

209
CRIME: ग्वाल्हेरच्या 'या' विद्यार्थ्याला पोलिसांत तक्रार करावी लागली; कारण? वाचा सविस्तर...

आर्थिक वर्ष २०२३ – २४ दरम्यान प्राप्तीकर विभागाला (Income Tax Department) काही व्यक्ती/संस्था यांनी केलेल्या विशिष्ट आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती प्राप्त झाली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत भरलेल्या करांच्या विश्लेषणाच्या आधारावर, विभागाला अशा व्यक्ती/संस्थांची ओळख पटली आहे ज्यांनी आर्थिक वर्ष २०२३ – २४ साठी भरणा केलेले कर संबंधित कालावधीत केलेल्या आर्थिक व्यवहारांशी सुसंगत नाहीत.

(हेही वाचा – Veer Savarkar : राजस्थान सरकारचा स्वागतार्ह निर्णय; पाठ्यक्रमात शिकवणार महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा इतिहास)

ई मेलद्वारे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारांची माहिती :

त्यामुळे, करदात्याच्या (Income Tax Department) सेवा उपक्रमाचा एक भाग म्हणून प्राप्तीकर विभागाने एक ई-मोहिम हाती घेतली आहे. यामागचा उद्देश अशा व्यक्ती/संस्थांना ई मेलद्वारे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारांची माहिती देता येणार आहे. तसेच एसएमएस करून त्यांना त्यांच्या आगाऊ कर दायित्वाची अचूक गणना करण्यास आणि १५ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी देय आगाऊ कर जमा करण्यास उद्युक्त केले जाणार आहे.

पारदर्शकता वाढवण्यासाठी AIS द्वारे करदात्यांच्या माहिती जाहीर केली जाते :

प्राप्तीकर विभागाला (Income Tax Department) करदात्यांच्या विशिष्ट आर्थिक व्यवहारांची माहिती विविध स्त्रोतांकडून प्राप्त होत असते. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि ऐच्छिक कर पूर्ततेला प्रोत्साहन देण्यासाठी ही माहिती वार्षिक माहिती निवेदनाद्वारे (AIS) जाहीर केली जाते आणि ती व्यक्ती/संस्था यांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येते. हे विश्लेषण करण्यासाठी AIS मधील ‘महत्त्वपूर्ण व्यवहार’ या स्वरुपात दर्शवण्यात येते.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : अमोल कीर्तीकरांना उमेदवारी; उद्धव ठाकरे यांना काँग्रेसकडून घरचा अहेर)

ई-फायलिंग खात्यावर लॉग इन :

महत्त्वपूर्ण व्यवहारांचे तपशील पाहण्यासाठी, व्यक्ती/संस्था त्यांच्या ई-फायलिंग (Income Tax Department) खात्यावर लॉग इन करू शकतात (आधीच तयार असल्यास) आणि अनुपालन पोर्टलवर याची पूर्तता करू शकतात. या पोर्टलवर महत्त्वपूर्ण व्यवहार पाहण्यासाठी ई-कॅम्पेन टॅबद्वारे प्रवेश करता येऊ शकतो.

ई-फायलिंग संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक :

ज्या व्यक्ती/संस्था ई-फायलिंग (Income Tax Department) संकेतस्थळावर नोंदणीकृत नाहीत त्यांना प्रथम ई-फायलिंग संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करावी लागते. नोंदणीकरिता ई-फायलिंग संकेतस्थळावरील ‘नोंदणी’ बटण दाबत त्यामध्ये संबंधित तपशील प्रदान केला जाऊ शकतो. यशस्वी नोंदणीनंतर, ई-फायलिंग खात्यात लॉग इन केले जाऊ शकते आणि ई-मोहीम टॅबच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण व्यवहार पाहण्यासाठी पूर्तता पोर्टलवर प्रवेश केला जाऊ शकतो.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : “मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही”)

करदात्यांना पूर्तता सुलभ करण्यासाठी प्राप्तीकर विभागाचा उपक्रम :

करदात्यांना पूर्तता सुलभ करण्यासाठी आणि करदात्यांच्या सेवा वाढवण्याची त्यांची वचनबद्धता बळकट करण्यासाठी प्राप्तीकर विभागाचा हा आणखी एक उपक्रम आहे. (Income Tax Department)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.