बसपाच्या अध्यक्षा मायावती (Mayawati) यांनी अगदी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. आम्ही ना कुणासोबत युती करणार ना आघाडी, ना तिसरी आघाडी करणार. लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार, असे सांगितल्याने आता उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, काँग्रेसही गोची झाली आहे.
(हेही वाचा Indi alliance अधिकृतपणे फुटली; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींकडून काँग्रेसला ‘दे धक्का’)
समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पडणार
बसपा संपूर्ण तयारी आणि ताकदीने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. हा निर्णय कायम आहे. तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या अफवा पसरवणे चुकीचे आहे. बसपने जोरदार निवडणूक लढविल्यामुळे विरोधक बऱ्यापैकी अस्वस्थ दिसत आहेत. त्यामुळेच ते दररोज विविध प्रकारच्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र बहुजन समाजाच्या हितासाठी बसपा एकट्याने निवडणूक लढवणार आहे. बसपा प्रमुखांनी प्रसारमाध्यमांनाही फैलावर घेतले. अशा खोडसाळ बातम्या देऊन मीडियाने आपली विश्वासार्हता गमावू नये, लोकांनीही सावध राहावे, असे त्यांनी लिहिले आहे. याआधी 15 जानेवारीला मायावती (Mayawati) यांनी वाढदिवसानिमित्त एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पडून त्याचा फायदा भाजपाला होण्याची दाट शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community