आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या (ICC Cricket Rankings) मालिकेत 4-1 असा विजय मिळवत भारतीय संघ जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारत सध्या आयसीसी वनडे आणि टी20 क्रमवारीत देखील अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ आता तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन संघ बनला आहे.
(हेही वाचा – Income Tax Department कडून आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर ‘ई-मोहिम’ सुरु)
आकडेवारीनुसार भारतीय संघ 4636 गुण आणि 122 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 117 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड 111 गुणांसह तिसऱ्या तर न्यूझीलंड 101 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी जिंकली तरी ते भारताला पहिल्या स्थानावरून हटवू शकणार नाहीत. (ICC Cricket Rankings)
कर्णधार रोहित शर्माचा बोलबाला; क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघ अव्वल.
.
.
.#cricket #test #ODI #T20 #rohitsharma #ShubhamGill #klrahul #mumbai #ipl2024 #latestnews #india #bcci #ICC #Hindusthanpost pic.twitter.com/ZPhbJB5oXx— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) March 10, 2024
कसोटी क्रमवारीत भारत अव्वल :
भारताने पाचव्या कसोटीत (ICC Cricket Rankings) इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. भारत सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे 74 गुण आहेत. त्याची विजयाची टक्केवारी 68.51 टक्के आहे.
Top of the #WTC25 standings and now No.1 on the ICC Test Team Rankings 👏
More as India rise to the top 👇#INDvENGhttps://t.co/LmgSHWNHsq
— ICC (@ICC) March 10, 2024
(हेही वाचा – Rahul Shewale : गोवंडी येथे मोठ्या जल्लोषात मराठा भवनाचे लोकार्पण)
तिनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघ नंबर १ :
हे विशेष आहे की भारतीय क्रिकेट संघ (ICC Cricket Rankings) तिन्ही प्रकारात नंबर वन संघ बनला आहे. सध्या भारताचे 121 गुण आहेत. ऑस्ट्रेलिया 118 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 110 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे 266 गुण आहेत. तर इंग्लंड 256 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (ICC Cricket Rankings)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community