Ram Naik यांना पद्मभूषण म्हणजे सच्च्या मुंबईकराचा सन्मान – आशिष शेलार

युती धर्म म्हणजे काय याचा आदर्श नमुना म्हणजे राम नाईक! भाजप- शिवसेना युती म्हणजे निव्वळ जागावाटप नव्हे, तर परस्परांसाठी तिथल्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने कामही कसे करायचे याचा आदर्श राम नाईक यांनी घालून दिला. आज त्यांचे सर्वांनी अनुकरण करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन यावेळी बोलताना शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले.

222
Ram Naik यांना पद्मभूषण म्हणजे सच्च्या मुंबईकराचा सन्मान - आशिष शेलार

‘बॉम्बे’, ‘बंबई’चे ‘मुंबई’ करणारे, मुंबईचे पर्यावरण चांगले रहावे यासाठी सीएनजी आणणारे. सुखकर रेल्वे प्रवासासाठी ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळ’ स्थापन करणारे, पहिली महिला गाडी सुरू करणारे, मुंबईतील घरा – घरात पाईपने गॅस पुरवणारे (Ram Naik) राम नाईक यांना ‘पद्म भूषण’ देऊन राष्ट्रपतींनी सच्च्या मुंबईकराचा सन्मान केला आहे, असे भावोद्गार भाजपा मुंबईचे अध्यक्ष व आमदार अॅड आशिष शेलार यांनी काढले. ‘पद्म भूषण’ सन्मान घोषित झाल्याबद्दल ज्येष्ठ भाजपा नेते व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी अॅड शेलार बोलत होते.

(हेही वाचा – HPV Vaccine : धारावीतील 5 हजार मुलींचे मोफत एचपीव्ही लसीकरण)

नाईक यांना पद्मभूषण सन्मान घोषित :

‘सामाजिक क्षेत्रातील अपवादात्मक व अतिविशिष्ट जनसेवे’साठी राम नाईक यांना पद्मभूषण सन्मान घोषित झाला. साठ वर्षांच्या त्यांच्या प्रदीर्घ राजकीय- सामाजिक कारकिर्दीत बोरीवली विधानसभा क्षेत्रातून त्यांनी निवडणुकीच्या राजकारणास प्रारंभ केला. तिथून सलग तीनदा आमदार व त्यानंतर सलग पाचदा खासदार म्हणून ते निवडून आले. सलग आठ निवडणुका जिंकणारे राम नाईक (Ram Naik) हे मुंबईतील एकमेव राजकीय व्यक्तिमत्व. एवढेच नव्हे तर संपूर्ण राज्यात बोरीवली ही एकमेव विधानसभा जिथून भाजपा स्थापनेपासून आजपर्यंत सतत भाजपाच निवडून येत आहे. या सर्वांचे औचित्य साधून काल हजारो नागरिकांच्या उपस्थितीत बोरिवली येथे राम नाईक यांचे नागरी अभिनंदन करण्यात आले.

(हेही वाचा – ICC Cricket Rankings : कर्णधार रोहित शर्माचा बोलबाला; क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघ अव्वल)

राम नाईक हे आमचे आदर्श – खासदार गोपाळ शेट्टी

“माझ्यासारख्या झोपडपट्टीतील तरुणाला आपल्या कामामुळे आपलंसं करून त्याला केवळ कार्यकर्ता बनवून न थांबता नगरसेवक, आमदार, खासदार बनविणारे आमचे आदर्श म्हणजे राम नाईक! त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच ‘पद्म भूषण’ सन्मान (Ram Naik) राम नाईक यांना देण्यात येत आहे. मुंबईत आजवर अनेक राजकीय नेते झाले पण आपल्या जनसेवेसाठी ‘पद्म भूषण’ मिळालेले राम नाईक हे एकमेव आहेत,” असे यावेळी बोलताना स्थानिक खासदार गोपाल शेट्टी म्हणाले.

राम नाईक यांचे सर्वांनी अनुकरण करण्याची गरज – खासदार गजानन कीर्तिकर

“युती धर्म म्हणजे काय याचा आदर्श नमुना म्हणजे राम नाईक! भाजप- शिवसेना युती म्हणजे निव्वळ जागावाटप नव्हे, तर परस्परांसाठी तिथल्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने कामही कसे करायचे याचा आदर्श (Ram Naik) राम नाईक यांनी घालून दिला. आज त्यांचे सर्वांनी अनुकरण करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन यावेळी बोलताना शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले; अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन)

मी कृतकृत्य आहे – राम नाईक

“मी कृतकृत्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि त्यानंतर डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार यामुळे देशसेवेसाठी राजकारण – समाजकारण हे ध्येय मानून मी जगलो. ‘अंत्योदय’ हे राजकारणाचे लक्ष्य असले पाहिजे या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या संदेशाचे पालन करीत आलो म्हणूनच एकाच वेळी राजकीय काम आणि कुष्ठपीडित, मच्छीमार, अणू ऊर्जा प्रकल्प पीडित यांच्यासाठीही काम केले. सदैव करीत राहीन.”, अशा शब्दात (Ram Naik) राम नाईक यांनी आपल्या सत्काराला उत्तर दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.