उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवार, ९ मार्च रोजी मुंबईत परस्पर मुंबई उत्तर -पश्चिम मतदारसंघात अमोल कीर्तिकर उमेदवार म्हणून घोषित केली. त्यानंतर लागलीच काँग्रेसकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यांना काँग्रेस मुंबई प्रदेश अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले.
अमोल कीर्तिकारांना उमेदवारी
उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी सायंकाळी Lok Sabha Election 2024 साठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंधेरी पूर्व व जोगेश्वरी पूर्व, वर्सोवा व अंधेरी पश्चिम येथील चार विधानसभा क्षेत्रातील चार शिवसेना शाखांना भेटी देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून आपल्या पक्षाचे उपनेते आणि युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली. आता मी तुम्हाला उमेदवार दिलेलाच आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच शिवसैनिकांनी अमोल कीर्तीकरांच्या नावाची घोषणा देण्यास सुरुवात केली.
(हेही वाचा CM Eknath Shinde : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले; अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन)
काय म्हणाले काँग्रेसचे नेते?
मविआचे जागावाटप होण्याआधीच उद्धव यांनी उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून माजी खासदार संजय निरुपम यांच्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वर्षा गायकवाड यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटले आहे की, मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या (Lok Sabha Election 2024) जागांच्या वाटपासंदर्भात हे नमूद करू इच्छिते की, महाविकास आघाडीची चर्चा अजून सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे, निर्णय अद्याप झालेला नाही, अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे जागावाटप जाहीर होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. तर संजय निरुपम यांनी, अशा प्रकारे परस्पर निर्णय घेता येणार नाही, ज्या उमेदवाराची घोषणा केली त्याच्यावर आधीच कोविड काळात खिचडी घोटाळा केल्याचा आरोप असून त्यांची चौकशी सुरु आहे, असे निरुपम म्हणाले.
Join Our WhatsApp Community